राणी नाराह
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ३१, इ.स. १९६५ गुवाहाटी | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
राणी नाराह (३१ ऑक्टोबर, १९६५ - ) या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी. त्या २०१६-२२ दरम्यान राज्यसभा खासदार होत्या. त्या यापूर्वी लखीमपूर मतदारसंघातून १९९८, १९९९ आणि २००९ या तीन वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. त्या २०१२ ते २०१४ या काळात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.
चरित्र
[संपादन]नाराह ह्या गुवाहाटी विद्यापीठाच्या पदवीधर आहेत.[१] आसाम राज्य संघाची कर्णधार म्हणून त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळला आहे.[२] २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये विलीन होईपर्यंत त्या भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) च्या अध्यक्षा होत्या.[३] बीसीसीआयच्या महिला समितीच्या त्या सदस्य होत्या. [३] नाराह यांनी आसाम महिला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आसाम क्रिकेट असोसिएशन आणि आसाम फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.[४][५][६]
नाराह यांची १९९८ मध्ये त्यांच्या वयाच्या ३३ च्या वर्षी आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. [१] त्याच वर्षी त्या लखीमपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. १९९९ आणि २००९ मध्ये त्या लखीमपूरमधून पुन्हा निवडून आल्या.[१] नाराह यांची २००३ मध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेवर निवड झाली. [७] २००९ मध्ये त्यांची लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उपमुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [८] २०१२ मध्ये, नाराह यांचा भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. [९] २०१६ मध्ये नाराह हे आसाममधून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. [१०]
आसाम विधानसभेचे सहावेळा सदस्य आणि आसाम सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री, भरत नाराह यांच्याशी राणी यांचा विवाह झाला आहे.[२][११]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Smt. Ranee Narah". Government of India. 5 May 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "Ex-cricketer clean bowls dissidence". Hindustan Times. 26 March 2009. 20 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ a b "WCAI to be disbanded shortly". ESPN Cricinfo. 13 November 2006. 26 October 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Women footballers honoured". The Assam Tribune. 10 November 2008. 28 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Dynamo Triumph". Yahoo. 6 August 2012. 27 October 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Tiding over dissidence".
- ^ "Tribune News Service". The Tribune India. 17 July 2003. 6 December 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Ranee deputy whip of LS". The Assam Tribune. 25 November 2009. 27 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Sportsperson-turned-politician Narah gets ministerial berth". Zee News. 28 October 2012. 30 June 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Assam: Ahead of assembly polls, Congress wins both Rajya Sabha seats in cross-voting". 22 March 2016.
- ^ "Hereditary politics: Political families of India". इंडिया टुडे. 12 April 2004. 26 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2012 रोजी पाहिले.