टुंड्रा प्रदेश
टुंड्रा प्रदेश (सामी शब्द - टुंडार (tūndâr) वरून) भौगोलिकदृष्ट्या असा प्रदेश जिथे वनस्पतींची वाढ कमी तापमान आणि मर्यादित वाढीच्या काळामुळे प्रभावित होते. टुंड्राचे तीन विभाग आणि संबंधित प्रकार आहेत: आर्क्टिक टुंड्रा, अल्पाइन टुंड्रा आणि अंटार्क्टिक टुंड्रा.
आर्क्टिक टुंड्रा प्रदेश हा आर्क्टिक महासागरा जवळचा भाग आहे तसेच अंटार्क्टिक टुंड्रा हा अंटार्क्टिक जवळचा भाग आहे. अल्पाइन टुंड्रा हे जगभर विखुरलेले प्रदेश आहे ज्यामध्ये वनस्पती / झाडे नसतात कारण तिथल्या कठोर हवामानासह ते उच्च उंचीवर आहे. उत्तर अमेरिकन कॉर्डिलेरा आणि उत्तर अमेरिकेतील उत्तर अप्पालाचियन पर्वत, युरोपचे आल्प्स आणि पिरेनीज, आशियातील हिमालय आणि काराकोरम, दक्षिण अमेरिकेचे आन्देस, आफ्रिकेचे पूर्वेकडील पर्वत, ऑस्ट्रेलियाचे स्नो माउंटन, न्यू झीलंडचे दक्षिण बेट आणि स्कॅन्डिनेव्हियन पर्वतांमध्ये अल्पाइन टुंड्राचे मोठे प्रदेश आढळतात.
- आर्क्टिक टुंड्राचा प्रदेश
- आन्देस
- कोसिस्झको नॅशनल पार्क, ऑस्ट्रेलिया
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |