Jump to content

मेरीलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेरिलँड या पानावरून पुनर्निर्देशित)
मेरीलॅंड
Maryland
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: ओल्ड लाइन स्टेट (Old Line State)
ब्रीदवाक्य: Fatti maschii, parole femine
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी अ‍ॅनापोलिस
मोठे शहर बाल्टिमोर
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४२वा क्रमांक
 - एकूण ३२,१३३ किमी² 
  - रुंदी १६३ किमी 
  - लांबी ४०० किमी 
 - % पाणी २१
लोकसंख्या  अमेरिकेत १९वा क्रमांक
 - एकूण ५७,२३,५५२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २०९.२/किमी² (अमेरिकेत ५वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $६९,२७२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २८ एप्रिल १७८८ (७वा क्रमांक)
संक्षेप   US-MD
संकेतस्थळ www.maryland.gov

मेरीलॅंड (इंग्लिश: Maryland, En-us-Maryland.ogg मेरीलंड ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले मेरीलॅंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १९व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मेरीलॅंडच्या आग्नेयेला अटलांटिक महासागर, नैऋत्येला वॉशिंग्टन डी.सी., पूर्वेला डेलावेर, पश्चिमेला व दक्षिणेला व्हर्जिनिया, वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. अ‍ॅनापोलिस ही मेरीलॅंडची राजधानी तर बाल्टिमोर हे सर्वात मोठे शहर आहे. मेरीलॅंडच्या क्षेत्रफळाच्या २१ टक्के भाग पाण्याने (चेसापीकचा उपसागर) व्यापला आहे. मेरीलॅंडच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा वॉशिंग्टन-बाल्टिमोर महानगर क्षेत्रात वसला आहे.

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मेरीलॅंडचा देशात पहिला क्रमांक लागतो. शेती, जीवशास्त्र संशोधन, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

मोठी शहरे

[संपादन]

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: