Jump to content

मुफ्ती महंमद सईद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुफ्ती मोहम्मद सईद या पानावरून पुनर्निर्देशित)
मुफ्ती महंमद सईद

कार्यकाळ
१ मार्च २०१५ – ७ जानेवारी २०१६
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट
कार्यकाळ
२ नोव्हेंबर २००२ – २ नोव्हेंबर २००५
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील गुलाम नबी आझाद

कार्यकाळ
१९८९ – १० नोव्हेंबर १९९०
पंतप्रधान व्ही.पी. सिंग
मागील बुटासिंग
पुढील चंद्रशेखर

जन्म १२ जानेवारी १९३६ (1936-01-12)
बिजबेहारा, अनंतनाग जिल्हा
मृत्यू ७ जानेवारी, २०१६ (वय ७९)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (१९९९ - २०१६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९ पर्यंत)
नाते मेहबूबा मुफ्ती (मुलगी)
गुरुकुल अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
धर्म मुस्लिम

मुफ्ती महंमद सईद (१२ जानेवारी १९३६ - ७ जानेवारी २०१६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. ते २००२-०५ व २०१५-१६ ह्या काळात जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर होते. मुफ्ती महंमद सईद इ.स. १९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री राहिले होते.

२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची परिणती त्रिशंकू निकालांत झाली. पीडीपीला २८, भारतीय जनता पक्षाला २५ तर नॅशनल कॉन्फरन्सला १५ जागांवर विजय मिळाला. सरकार स्थापनेसाठी अनेक महिने पीडीपी व भाजपदरम्यान वाटाघाटी चालू होत्या. अखेर १ मार्च २०१५ रोजी ह्या पक्षांनी एकत्र सरकार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मुफ्ती महंमद सईदांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ७ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली व त्यानंतर एप्रिल २०१६ मध्ये सईदांची मुलगी मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदावर आली.

बाह्य दुवे

[संपादन]