गुलाम नबी आझाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुलाम नबी आझाद (रोमन लिपी: Ghulam Nabi Azad) (मार्च ७, इ.स. १९४९ - हयात) हे काश्मिरी-भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

राजकीय कारकीर्द[संपादन]

आझाद सर्वप्रथम इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. १९९० पासून इ.स. २००५ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांच्या राजवटीत केंद्रीय मंत्रिमंडळांत संसदीय कार्यमंत्री म्हणून काम सांभाळले. तसेच ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूकमंत्री होते. इ.स. २००५ ते इ.स. २००८ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच मे, इ.स. २००९पासून ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत.

विवाद[संपादन]

जून, इ.स. २००८ मध्ये आझाद सरकारने जमीन हिंदू मंदिरांच्या नावे करण्याचा निर्णय घोषित केला. अनेक मुस्लिम संघटनांनी याचा विरोध करत निदर्शने केली. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला[ संदर्भ हवा ]. या निर्णयामुळे नाराज हिंदूंनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला, त्यातून उद्भवलेल्या दंगलींत ७ जणांचा बळी गेला[ संदर्भ हवा ]. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने आझाद सरकार बरखास्त झाले. आझाद यांनी जुलै ७, इ.स. २००८ रोजी पदाचा राजीनामा देत जुलै ११, इ.स. २००८ रोजी पद सोडले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.