Jump to content

महिला कबड्डी चॅलेंज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला कबड्डी
मोसम
खेळ कबड्डी
प्रारंभ २०१६
देश भारत ध्वज भारत
सद्य विजेता संघ स्टॉर्म क्वीन
टीव्ही सहयोजक स्टार स्पोर्ट्स

महिला कबड्डी चॅलेंज ही भारतातील एक कबड्डी लीग आहे जी महिलांसाठी प्रो कबड्डी लीगप्रमाणे सुरू करण्यात आली. २०१६ मधील उद्घाटन हंगामात तीन महिला संघ सहभागी झाले आणि ही लीग भारतातील सात शहरांमध्ये खेळवली गेली.

१ला हंगाम

[संपादन]

पहिला सीझन महिला कबड्डी चॅलेंज, २०१६ मध्ये, २८ जून ते ३१ जुलै दरम्यान खेळला गेला आणि भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे प्रसारित करण्यात आला. ३१ जुलै रोजी पुरुषांच्या आवृत्तीसह अंतिम सामना खेळवला गेला.

स्टॉर्म क्वीन आणि फायर बर्ड्स यांच्यात अंतिम सामना झाला. स्टॉर्म क्वीन्सने अंतिम फेरीत फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

संघ आणि ठिकाणे

[संपादन]
२०१६, महिला कबड्डी चॅलेंज स्पर्धेची ठिकाणे

पहिल्या हंगामात तीन संघ सहभागी झाले

स्पर्धा ठिकाणी खेळविली गेली

  • सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियम, मुंबई
  • सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
  • गचीबावली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद
  • श्री कांतीरवा स्टेडियम, बंगळूर
  • नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम, कोलकाता
  • त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दिल्ली