Jump to content

मल्लिका श्रीनिवासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मल्लिका श्रीनिवासन
जन्म इ.स. १९५९
,अल्वलकुरुची तिरूवेलीनल्ली ,तमिलनाडू भारत
निवासस्थान शिवकाशी,तामिळनाडू,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण इकोनोमेट्रिक्स या विषयात मद्रास विद्यापीठातून त्यांना सुवर्णपदक
प्रशिक्षणसंस्था

भारतीदासन इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट, मद्रास विद्यापीठ,

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ
पेशा व्यावसायिक
मालक ट्रॅक्टर्स ॲंड फार्म इक्विपमेंट लिमिटेड
पदवी हुद्दा अध्यक्ष आणि सीईओ
संचालकमंडळाचे सभासद टाटास्टील ,टाटा ग्लोबल बिव्हरेजेस ,एजीसीओ
धर्म हिंदू
जोडीदार वेणू श्रीनिवासन
अपत्ये दोन
वडील ए.शिवशैलम
आई इंदिरा शिवशैलम
पुरस्कार पद्मश्री
संकेतस्थळ
TAFE.com


मल्लिका श्रीनिवासन (१९५९ - हयात) या ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड या १९६० साली स्थापन झालेल्या आणि ट्रॅक्टरशी संबंधित व्यवसाय करणा-या चेन्नई येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत. एजीसीओ कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित संस्थेच्या तसेच टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड या संस्थेच्या समिती सदस्या आहेत. इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट हैद्राबाद, भारतीय प्रौद्योगिकी संस्था, चेन्नई आणि भारतीदासन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्रिची या संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या त्या सदस्या आहेत.[१] [२]

विशेष योगदान

[संपादन]

मल्लिका यांनी टीएएफई संस्थेची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवसायाची उलाढाल आजमितीला भारतीय चलनात ९ हजार कोटींच्या आसपास आहे. यामध्ये ट्रॅक्तर तसेच शेतीशी संबंधित यंत्रे आणि अवजारे,डिझेल इंजिन,हायड्रोलिक पंप,आणि शेतकी यांचा समावेश आहे. मल्लिका यांनी व्यावसायिक स्तरावर काॅनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स ट्रॅक्टर मेन्युफेक्चर असोसिएशन यासारख्या व्यावसायिक संस्थांचे नेतृत्व केले आहे.[३]

शैक्षणिक अर्हता

[संपादन]

इकोनोमेट्रिक्स या विषयात मद्रास विद्यापीठातून त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. कुलगुरूंच्या मानद यादीतील विद्यार्थिनी म्हणून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.अल्फा बीटा गेमा सोसायटी, व्हाॅर्टन स्कूल ऑफ बिझनेस ,पेन्सिल्वेनिया विद्यापीठ येथील यशस्वी अशा १२५ माजी विद्यार्थ्यापैकी त्या एक आहेत.[४]

कामाचे स्वरूप

[संपादन]

ट्रॅक्टरच्या व्यावसायिक उद्योगात काम करताना भारतीय शेतकरी आणि त्यांची आर्थिक स्थिती यांचा समन्वय साधून काम करण्याचा अनुभव मल्लिका यांना आहे.नव्या शेतीपद्धती,पिकांच्या वेगवेगळ्या प्रजाती,भूजल व्यवस्थापन याद्वारे शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांच्या संस्थेने केले आहे.फळतोडणी, रोपलावणी,धान्यकाढणी यासारख्या शेतीतील विविध कामांमध्ये अचूकता आणि वेग असावा यासाठी अभिनव पद्धतीची अवजारे पुरविणे हे त्यांच्या कामाचे ध्येय आहे.[५]

सन्मान

[संपादन]

मल्लिका यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार यांनी गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार दिली आहे.फोर्ब्स इंडियाचा वूमन लीडर ,फोर्ब्स एशियाच्या एशियन पॉवर बिझनेस वूमन निवडीमध्ये दुसरे स्थान, फोर्च्यून इंडियाच्या श्रेयनामावलीत शक्तीशाली भारतीय महिला म्हणून नोंद ,एनडीटीव्ही या माध्यमाद्वारे २०१२ साली प्राॅफिट बिझनेस लीडरशीप ॲवाॅर्ड ,झी अस्तित्व ॲवाॅर्ड हे सन्मान त्यांना मिळाले आहेत.[६] [७] [८]

  1. ^ "DIRECTORS AND OFFICERS". AGCO. Retrieved 2013-04-16
  2. ^ "Board of Directors". TATA Global Beverages Limited. Retrieved 2013-04-16. , "Board of Directors". TATA Steel. Retrieved 2013-04-16.
  3. ^ "Mallika Srinivasan". The Wall Street Journal. Retrieved July 28, 2015.
  4. ^ किडवाई नीना,अनुवाद गजेंद्रगडकर वर्षा,३० सामर्थ्यशाली स्त्रिया,सकाळ प्रकाशन,२०१६ पृृष्ठ २७२
  5. ^ किडवाई नैना,अनुवाद गजेंद्रगडकर वर्षा,३० सामर्थ्यशाली स्त्रिया,२०१६,सकाळ प्रकाशन,पृष्ठ १७०
  6. ^ "A new voice in a tradition bound industry, Mallika Srinivasan, WG'85". The Wharton School, The University of Pennsylvania. Retrieved July 28, 2015.
  7. ^ "Business Thought Leader of the Year: Mallika Srinivasan". NDTV Profit. Retrieved July 28, 2015.
  8. ^ "Business Thought Leader of the Year: Mallika Srinivasan". NDTV Profit. Retrieved July 28, 2015.  "Mallika Srinivasan". Amazon.com. Retrieved 2013-04-16.