मरगतम चंद्रशेखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

म॑रगतम चंद्रशेखर (नोव्हेंबर ११, इ.स. १९१७- नोव्हेंबर १९, इ.स. २००१) (तमिळ: மரகதம் சந்திரசேகர்) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. त्या इ.स. १९५२ आणि इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील तिरूवल्लूर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील श्रीपेरूम्बुद्दूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. मे २१, इ.स. १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी हे मार्गाथाम चंद्रशेखर यांच्या प्रचारासाठी श्रीपेरूम्बुद्दूर येथे आले असता त्यांची तमिळ वाघांनी बॉम्बस्फोट घडवून हत्या केली.त्या सभेच्या ठिकाणी मार्गाथाम चंद्रशेखर उपस्थित होत्या. त्या इ.स. १९७० ते इ.स. १९८४ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या.