भागीरथी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भागीरथी
भागीरथीचे गंगोत्री येथील पात्र
उगम गौमुख, हिमालय (गंगोत्रीच्या १८ किमी उत्तरेस)
मुख देवप्रयाग, उत्तराखंड
पाणलोट क्षेत्रामधील देश उत्तराखंड
लांबी २०५ किमी (१२७ मैल)
उगम स्थान उंची ३,८९२ मी (१२,७६९ फूट)
सरासरी प्रवाह २५७.८ घन मी/से (९,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ९,९२१
ह्या नदीस मिळते गंगा नदी

भागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यामधील नदीगंगेच्या दोन मूळ नद्यांपैकी एक नदी आहे (अलकनंदा नदी ही दुसरी). भागीरथी उत्तराखंडच्या उत्तर भागात तिबेटच्या सीमेजवळील गोमुख येथे उगम पावते. ती उत्तरकाशीतेहरी ह्या जिल्ह्यांमधून वाहत जाऊन देवप्रयाग येथे गंगेला मिळते.

हिंदू पुराणानुसार कोसलनरेश भगीरथ ह्याने आपल्या ६०,००० पूर्वजांची कपिल ऋषीच्या शापातून मुक्तता करण्यासाठी स्वर्गामधून गंगेला पृथ्वीवर आणले. त्याच्या प्रयत्नांसाठी गंगेच्या ह्या पात्राला भागीरथी असे नाव दिले गेले.

हिंदू धर्मामधील उत्तरकाशी हे पवित्र गाव भागीरथीच्या काठावर वसले आहे.