ब्रगांझाची कॅथेरीन
Queen consort of England, Scotland and Ireland (1638–1705) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | नोव्हेंबर २५, इ.स. १६३८ Ducal Palace of Vila Viçosa (एव्होरा, पोर्तुगाल) | ||||
| मृत्यू तारीख | डिसेंबर ३१, इ.स. १७०५ Palácio da Bemposta (लिस्बन, पोर्तुगाल) | ||||
| चिरविश्रांतीस्थान |
| ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| पद |
| ||||
| उत्कृष्ट पदवी |
| ||||
| कुटुंब |
| ||||
| वडील | |||||
| आई | |||||
| भावंडे |
| ||||
| अपत्य |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| |||||
ब्रगांझाची कॅथेरीन ( पोर्तुगीज: Catarina de Bragança; २५ नोव्हेंबर, १६३८:व्हिला व्हिसोसा, पोर्तुगाल - ३१ डिसेंबर, १७०५:बेम्पोस्ता महाल, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही इंग्लंडच्या दुसऱ्याचार्ल्सची राणी होती व त्याद्वारे ती इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होती.
कॅथेरीन पोर्तुगालच्या चौथ्या होआवची मुलगी होती. चार्ल्सच्या मृत्यूनंतर कॅथरीन पोर्तुगालला परतली आणि तिचा भाऊ पेद्रो दुसरा अनुपस्थित असताना १०७ आणि नंतर परत १७०४-०६ दरम्यान पोर्तुगालची कारभारीण होती.
कॅथरीनला मुले नव्हती. तिचे तीन गर्भपात झाले. [१] तिच्या पतीने अनेक उपवस्त्रे ठेवली होती. यांपैकी बार्बरा पामर, क्लीव्हलँडची पहिली डचेस हिला कॅथरीनने आपल्या महालातील सोबतीण म्हणून स्वीकारणे भाग पाडले गेले. [२] या बायकांद्वारे चार्ल्सला अनेक मुले झाली.

कॅथेरीन आणि चार्ल्सच्या लग्नाचा भारताच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या तद्नंतरच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाला. लग्नात हुंडा म्हणून मिळलेली मुंबईची सात बेटे चार्ल्सने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली. कंपनीने आपले मुख्यालय तेथे हलविले. कालांतराने मुंबई हे भारतातील मुख्य शहरांपैकी एक झाले.
कॅथेरीनला ब्रिटनमध्ये चहा पिणे प्रचलित केल्याचे श्रेय दिले जाते. [३] [४] याशिवाय तिने ऊस, लाख, कापूस आणि चिनी मातीच्या वस्तूं वापरात आणल्या. याने इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांत चव, शिष्टाचार आणि कारागिरीत मोठे बदल घडून आले.
वंशावळ
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Kenneth J. Panton; Kenneth John Panton (24 February 2011). Historical Dictionary of the British Monarchy. Scarecrow Press. pp. 90–91. ISBN 978-0-8108-5779-7. 15 July 2012 रोजी पाहिले.
- ↑ Herman (2005)
- ↑ "Catherine of Braganza", UK Tea Council. Retrieved 1 March 2013
- ↑ Martin, Laura C (2007). Tea: the drink that changed the world. Catherine of Braganza: Tuttle Publishing. pp. 120–123. ISBN 978-0-8048-3724-8.
स्रोत
[संपादन]- Herman, Eleanor (2005). Sex with Kings: 500 Years of Adultery, Power, Rivalry, and Revenge. The Contempt of the World: William Morrow Paperbacks. ISBN 0-06-058544-7.
- Laufer, Guida Myrl Jackson (1999). Women rulers throughout the ages: an illustrated guide. ABC-CLIO. p. 83. ISBN 1-57607-091-3.