Jump to content

बेप वॉस्कुइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलिझाबेथ वॉस्कुइल
जन्म ५ जुलै १९१९ (1919-07-05)
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
मृत्यू ६ मे, १९८३ (वय ६३)
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच
टोपणनावे बेप वॉस्कुइल, एली वॉसन
पेशा ओपेक्टातील कर्मचारी


एलिझाबेथ "बेप" वॉस्कुइल (किंवा एली वॉसन) (५ जुलै, इ.स. १९१९ - ६ मे १९८३) ही एक डच नागरिक होती. तिने ओपेक्टातील इतर कर्मचाऱ्यांसोबत मिळून ॲन फ्रॅंक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते.

बेपचा जन्म ॲम्स्टरडॅम शहरात झाला होता. ती योहान्स हेन्ड्रिक वॉस्कुइल यांच्या आठ मुलांपैकी एक होती. तिला इ.स. १९३७मध्ये ऑटो फ्रॅंक यांनी ओपेक्टा कंपनीत नौकरी दिली होती. फ्रॅंक कुटुंब तिथे लपण्यास आल्यावर केवळ निवडक लोकांना त्याच्याबद्दल माहिती होती. त्यात बेप एक होती. त्या काळात बेप त्यांच्यासाठी किराणामाल आणून देत असे. तिने ॲन, मार्गोपीटर यांच्यासाठी स्वतःच्या नावावर लघुलुपी व लॅटिन भाषेचा पत्रद्वारा अभ्यासक्रम मागवला होता.

१५ मे, इ.स. १९४६ला तिने कॉर्नेलिअस व्हान विक याच्यासोबत लग्न केले. यानंतर तिने ओपेक्टात काम करणे सोडून दिले. पुढे तिला चार मुले झाली; टॉम, कॉर, जूप आणि एक मुलगी, ॲन-मारी; जिचे नाव ॲन फ्रॅंकवरून ठेवले होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान तिच्या कामांसाठी तिचा सन्मान केला गेला. मात्र तिला प्रसिद्धी व मुलाखती देणे आवडत नसे. मात्र ती शेवटपर्यंत ऑटो फ्रॅंकच्या संपर्कात होती. तिने ॲन व तिच्या दैनंदिनीवर प्रकाशित लेखांची एक कात्रणवही केली होती.

बाह्य दुवे

[संपादन]