Jump to content

ओट्टो फ्रँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑटो फ्रॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑटो फ्रॅंक
जन्म १२ मे १८८९ (1889-05-12)
जर्मनी
मृत्यू १९ ऑगस्ट, १९८० (वय ९१)
बिर्सफाल्देन, स्वित्झर्लंड
मृत्यूचे कारण फुफ्फुसाचा कर्करोग
राष्ट्रीयत्व जर्मन (काढून घेतले गेले), डच, स्विस
पेशा बँक कर्मचारी व नंतर मसाल्याच्या पदार्थांचे विक्रेते.[]
ख्याती अ‍ॅन फ्रॅंकचे वडील
द डायरी ऑफ अ यंग गर्लचे प्रकाशक
धर्म ज्यू
जोडीदार १) ईडिथ हॉलंडर १९२५-४५ (तिच्या मृत्यूपर्यंत)
२)एलफ्रिड गैरिंगर १९५३-८० (त्यांच्या मृत्यूपर्यंत)
अपत्ये मार्गो फ्रॅंक, अ‍ॅन फ्रॅंक (दोघीही मृत)
वडील मायकल फ्रॅंक
आई अ‍ॅलिस स्टर्न फ्रॅंक


ऑटो हेनरिक फ्रॅंक (किंवा 'पिम फ्रॅंक) (१२ मे, इ.स. १८८९ – १९ ऑगस्ट १९८०) हे एक ज्यूधर्मीय जर्मन व्यापारी व मार्गो फ्रॅंक आणि अ‍ॅन फ्रॅंक यांचे वडील होते. त्यांच्या परिवारातील ते एकटेच होलोकॉस्टमधून वाचले. अ‍ॅनच्या मृत्यूनंतर तिची दैनंदिनी त्यांना मिळाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये द डायरी ऑफ अ यंग गर्ल प्रकाशित झाली. त्या दैनंदिनीच्या भाषांतरात तसेच त्यावर आधारित नाटक व चित्रपटांमध्येही त्यांचा सहभाग होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ कॅरोल अ‍ॅन ली, द हिडन लाइफ ऑफ ऑटो फ्रॅंक (हार्पर कॉलिन्स, २००३)