बिरबल साहनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ . बिरबल साहनी
जन्म ४ नोव्हेंबर, १८९१
भेरा, शाहपूर जिल्हा, ब्रिटिश भारत - सध्या पाकिस्तानमध्ये
मृत्यू १० एप्रिल, १९४९
लखनौ
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र वनस्पतीशास्त्र
कार्यसंस्था बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पालेओबोटानी
डॉक्टरेटचे मार्गदर्शक अल्बर्ट सेवर्ड
ख्याती प्राचीन वनस्पतींचा अभ्यास
पत्नी सावित्री सुरी

डॉ . बिरबल साहनी (Birbal Sahni-१४ नोव्हेंबर १८९१ ते १० एप्रिल १९४९)[१] : बिरबल यांचा जन्म पाकिस्तानातील भेरा या गावी झाला व शिक्षण लाहोरला झाले. बिरबल साहानी यांचे वडिलही रसायनशानशास्त्रज्ञ होते तसेच ते समाज सुधारक व देशभक्तही होते. त्यांच्या वडिलांना ब्रिटिश सरकारनी ' रावबहादूर ' ही पदवी दिली होती. बिरबल यांची आई धार्मिक वृत्तीची होती . पण मुलांनी उत्तम शिक्षण घेण्यासाठी परदेशी जावे अशी तिची इच्छा होती . बिरबलाला नेतृत्व , साहस व निष्पक्षपातीपणा हे गुण वडिलांकडून मिळाले. मुलांच्या भांडणातील न्यायनिवाडा ते करीत . साहसीपणामुळे ते दऱ्याखोऱ्यात फिरत असत . यामुळेच वनस्पतीशास्त्र व जीवाश्म यांच्याबद्दल त्यांना अभ्यासाची गोडी लागली . त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभली होती. त्याच्या जीवावर त्यांनी अनेक पदव्या मिळविल्या . त्यांनी बी.एस्सी. नंतर उच्च शिक्षणासाठी केंब्रीजला प्रयाण केले. तेथे त्यांनी नैसर्गिकशास्त्राची बी.ए. पदवी १९१४ मिळवली व १९१५ साली दोन शोधनिबंध प्रसिद्ध केले . त्यांना १९१९ साली लंडनची व १९२९ साली केंब्रिज विद्यापीठाची अशी दोनदा पी.एच.डी. पदवी मिळाली . मात्र त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग भारतीयांसाठी करण्याचे ठरविले . त्यांना अनेक विद्यापीठांची पी. एच . डी . मिळाली. त्यांनी बनारस व लाहोर विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. तेथे नवनवीन प्रयोग केले. लखनौ विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र विभाग त्यांनी इतका सुधारला की परदेशी विद्यार्थी भारतात शिकायला येऊ लागले. ज्येष्ठ शिक्षकांनी नेहमी खालचे वर्ग शिकविण्यासाठी त्यांचा आग्रह असे. त्यांचे जर्मनफ्रेंच भाषावरही प्रभुत्व होते. प्राचीन भारतातील नाणी तयार करण्याचे तंत्र यावर संशोधन करून उपयुक्त लेख लिहिला त्याबद्दल त्यांना नेल्सन राईट पारितोषिक मिळाले . जीवशास्त्रातील लोकोत्तर संशोधनासाठी बर्कले पुरस्कार मिळाला . डॉ . रामन् यांनी त्यांना ' चैतन्यमूर्ती ' म्हटले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

बिरबल साहनी पुराविज्ञान संस्था

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बिरबल साहनी यांचे जीवनचरित्र Birbal Sahni Information in Marathi". माझा महाराष्ट्र (इंग्रजी भाषेत). 2022-01-30. Archived from the original on 2022-02-24. 2022-02-24 रोजी पाहिले.