बाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

*खातां आंब्याच्या कोयीची बाटी, हृदयविकार मधुमेह मुत्रविकारांची बांधाल ताटी*

-✍🏼 राधेश बादले पाटील, पंढरपूर

🚩 *साप्ताहिक राष्ट्रसंत*🚩

कोयीची बाटी नव्हे तर मुखशुद्धी व आरोग्याची सुपारी हि चघळायला हवी ना मग!

  आंबा कोयांची साल सोलून आतील बाठी धुवून, पंचलवण मीठ टाकलेल्या पाण्यात शिजवाव्या. नंतर हलक्या भाजाव्या. त्याचे सुपारी सारखे तुकडे करावेत, चुर्ण, पावडर, तेल करावे. सुपारीसारख्या वा मुखशुद्धी म्हणून खाव्यात.

*१)मधुमेह , मुत्रविकार:- ज्यांना लघवी करण्यास ञास होतो , लघवी ताकद लावून करावी लागते. त्यांची लघवी लवकर सुटते. प्रोस्टेटचा ञास असणाऱ्यांना खूपच फायदेशीर ...रक्तातील व लघवीतील साखर (युरीन शुगर) कमी होते. अर्थातच  मुत्रविकार कमी होऊन मधुमेह नियंत्रित होतो. म्हणून बाटी सतत चघळत खावी.*

२) उलटी, अतिसार, हृद्यविकार कमी करण्यास्तव:- आंबा कोईची बाटी खावी. किंवा बाटीची चुर्ण मधाबरोबर चाटून खावी.

*३) गर्भाशयातील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी, श्वेतपदर, रक्ती मुळव्याध बरे करण्यासाठी:- आंबा कोईची बाटी खावी. किंवा बाटीची चुर्ण गरम पाण्यात मिसळून खावी.*

*४) शुक्राणू दोषनाशक, वीर्यवर्धक:- आंबा कोईची बाटी खावी. किंवा बाटीची चुर्ण मधाबरोबर चाटून खावी. नंतर २ चमचे ज्येष्ठमध पावडर गरम पाण्यात मिसळून खावी.*

५) कोलेस्ट्राॅल नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास्तव:-

आंबा कोईची बाटी दररोज चघळून खावी. किंवा बाटीची चुर्ण मधाबरोबर चाटून खावी.

६) केसांमधील उवा काढण्यासाठी :- केसांच्या मुळांना बाटीची पावडर लिंबाच्या रसात कालवून लावणे. नंतर केस ४० मिनिटांनी धुवावेत. उवा नष्ट होतात.

*७) अतिसार, आतड्यांना छिद्रे, अल्सर असल्यास:- बाटी व बेलाचा गर एकत्र करुन वाटणे. ते दिवसातून ३ वेळा २ चमचे खाणे. वृद्धांसाठी हा उपाय रामबाण आहे.*

८) उच्च रक्तदाब:- बाटीमध्ये पोटॅशिअम व सोडिअम असल्याने १ चमचा बाटीची पावडर गरम पाण्याबरोबर दररोज खाल्ल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.

९) वजन कमी करण्यासाठी :- आंबा खाल्ल्याने वजन वाढते, मधुमेह अनियंत्रित होतो. मात्र आंबा कोईची बाटी खाल्याने  वजन कमी होते, मधुमेह नियंत्रित होतो. बाटीची पावडर पीठात मिसळून दररोज चपाती/भाकरी खाणे सोईस्कर ठरते.

१०) रक्ताल्पता:- बाटीत तांबे असल्याने रक्तवृद्धीस अडचण येत नाही.

*११) दंतमंजन:- तोंडातील विकार दुर करण्यास्तव, हिरड्या मजबूत करण्यासाठी, दातांची किड व रोग नियंत्रित करण्यासाठी बाटी पावडर- कडुलिंब पावडर- बेकींग पावडर- हळद- मीठ यांचे दंतमंजन वापरणे सर्वोत्तम ठरते.*

*१२) अकाली केस पांढरे होणे, केसगळती:- बाटीचे तेल लावणे. बाटीचे तुकडे करुन ते तीळ/खोबरे/ मोहरी यांपैकी एका तेलाच्या बाटलीत टाकून बाटली उन्हात ठेवणे. अग्नीसंस्कार करु नयेत. हे तेल उत्तम!*

*१३) शरिरातील उत्ती व स्नायुंचे मजबुतीकरण करण्यासाठी:- बाटीची चुर्ण मधाबरोबर चाटून खावी.*

१४) पशुंचा चारा:- पशुंचा पोषक चारा तयार करण्यासाठी पेंडींत बाटी मिसळावी.

१५) स्टार्च:- स्टार्च पावडर करण्यासाठी बाटी वापरतात.

१६) तोंडाचे विकार:- बाटीचे तेल लावावे.

*१७) आंबा कोईच्या बाटीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, १२%स्निग्धता, व विपुल प्रमाणात अ, क,ई जीवनसत्वे असतात. तसेच सप्तधातू वृद्धीकारक धातू असतात.*

*संदर्भ:- आयुर्पाठ , ✍🏼 राधेश बादले पाटील, पंढरपूर -९१७५५२०५००*

  🚩*साप्ताहिक राष्ट्रसंत* 🚩

बाटी हा भारत देशाचे राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे.[१] तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखार्‍यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो.

बाटीचा आकार गोल, त्रिकोणी, गोळा स्वरुपात असतो आणि त्यात कांदा, लसूण, सातू यांचे मिश्रण समाविष्ट करतात. बाफळा हा एक बाटीचाच प्रकार आहे मात्र तो नरम असतो. हे पदार्थ साजूक तूप, गरम डाळ तडका व चटणी बरोबर खातात. दाल बाटी बरोबर कुरमा दिला जातो. हा बीट मिक्सरवर किंवा खिसणीवर बारीक करून त्यात साजूक तूप, साखर घालून बनवितात.

डाळ बाटी कुरमा[संपादन]

डाळ बाटी कुरमा

ही जेवणाची एक पूर्ण थाळी आहे. डाळ तयार करण्यासाठी ५०% उडीद डाळ, व उर्वरित चणा आणि मूग डाळ वापरतात. बाटीसाठी गव्हाच्या कणकीचे लहान लहान घोळे बनवितात. हे गोळे निखार्‍यावर भाजून साजूक तुपात बुडवून ठराविक पद्धतीने बनविलेल्या मातीच्या भांड्यातून देतात. चमचमीत लाल मिरची, लसूण आणि हळद पूड किंवा चणाडाळीचे बेसनाचा तडका देऊन लहानशा बादलीतून डाळ देतात.

राजस्थान मध्ये ही डिश विशेषतः लग्न समारंभ, वाढदिवस, कौटुंबिक समारंभात खास करून दिली जाते.[२]

कुरमा ही विशेषतः गोड डिश आहे. याच्यात साखर किंवा गूळ वापरतात. ही चविष्ट बनण्यासाठी साजूक तूप घालतात. शिवाय यात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणाही घालतात. ही डाळ बाटी बरोबर दिली जाते.

डाळ बाटी थाळी[संपादन]

डाळ बाटी थाळी

मध्य प्रदेशात इतर खाद्य पदार्थाबरोबर डाळ बाटी दिली जाते.[३] उदाहरणार्थ निखार्‍यावर भाजलेल्या वांग्याचे भरीत किंवा भाजलेले बटाटे, बेसन आणि साजूक तुपात तयार केलेली ताकाची कढी हे पदार्थ डाळ बाटी बरोबर देतात. त्याने थाळीत पातळ पदार्थाची भर पडते. डाळ बाटी विविध पिठापासून बनविली जाते त्यामुळे तहान खूप लागते. ही शारीरिक अडचण कमी होण्यासाठी कढीचा चांगला उपयोग होतो.

मध्य प्रदेशातराजस्थान मध्ये चणाडाळ बेसन आणि इतर कडधान्यांपासून गट्ट्याची भाजीही बनवितात. ही थोडी कमी तेलकट असते. ही सुद्धा डाळबाटी थाळीत असते.

हळद, मीठ, टोमॅटो, लसूण घालून तयार केलेले कैरीचे लोणचे, खर्डा, मीठ, या बाबीही थालीत असतात. पश्चिम मध्यप्रदेशात माळवा प्रांतात केशर, साखर, लवंग घालून केलेला गोड भातही या थाळीत असतो. याबरोबरच कोशिंबीर ही खातात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "राजस्थानी पारंपारिक पाककृती".
  2. ^ "डाळ बाटी कुरमा - प्रसिद्ध राजस्थानी थाळी".
  3. ^ "मध्य प्रदेशातील पारंपारिक पाककृती".