कुणबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुणबी समाज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कुणबी ही महाराष्ट्रातील एक जात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात.[१] ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,तसेचविदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे १५% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.

कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. - कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशींहि या जातीचीं नांवें आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणें होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी- कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता धंदा होता. तो सध्यां जात झाला आहे. जात वेगळी असली तरी समाजात "तिरली कुणबी व मराठा" विवाह आंतरजातीय मानला जात नाही.मुळात फक्त शेती करीत असल्याने प्राकृत भाषेत या लोकांना कुणबी संबोधले आहे. खरे तर कुणबी आणि मराठा ही एकच जात असून बहुतांश कुणबी लोक हे जातीने मराठा किंवा मराठा कुणबी आहेत.शिवाय देशमुख,पाटील,या पदव्या सुद्धा काही प्रचलित आहेत.

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ It is a snapshot of the page as it appeared on 6 Jun 2009 13:15:06 GMT