Jump to content

बटाट्याच्या काचऱ्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बटाट्याच्या काचऱ्या
बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून
प्रकार उपवासाचे पदार्थ, फराळ
मुख्य घटक बटाटे
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य तेल, चटणी, मीठ, मिरेपूड

बटाट्याच्या काचऱ्या (Potato Wafers) म्हणजे बटाट्याचे तळलेले सडपातळ काप. ही महाराष्ट्रातील घराघरांमध्ये बनवली जाणारी एक लोकप्रिय, झटपट आणि चविष्ट सुकी भाजी आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम बेत आहे. कमी वेळेत बनणारी तसेच प्रवासात नेण्यास सोपी भाजी/स्नॅक्स म्हणून देखील ही ओळखली जाते.

काचऱ्यांचे विविध प्रकार

[संपादन]
  1. उपवासाच्या बटाटा काचऱ्या: जर ही भाजी उपवासाला खायची असेल, तर फोडणीत मोहरी आणि हिंग वापरत नाहीत. फक्त जीरे आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी दिली जाते. साध्या मिठाऐवजी शेंदेलोण आणि वरून अतिरिक्त भाजलेल्या दाण्यांचा कूट घातला जातो.
  2. मसालेदार कांदा-लसूण काचऱ्या: फोडणीमध्ये थोडा ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्घेतला जातो. यामुळे भाजीला एक छान खमंग चव येते. यात लाल तिखटाऐवजी कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला वापरल्यास भाजी अप्रतिम लागते.
  3. कुरकुरीत काचऱ्या: काही लोकांना बटाटे थोडे कडक किंवा कुरकुरीत आवडतात. यासाठी बटाट्याच्या चकत्या अगदी पातळ कापाव्यात. भाजी शिजवताना त्यावर अजिबात झाकण ठेवू नये, ती संपूर्णपणे उघडी ठेवून मंद आचेवर जास्त तेलात फ्राय करावी.

साहित्य

[संपादन]

यासाठी बटाटे, कांदा, तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, मीठ, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड तसेच थोडी साखर वापरली जाते.

कृती

[संपादन]

या पदार्थाच्या कृतीसाठी बटाट्याच्या काचऱ्या येथे टिचकी द्यावी.

संदर्भ

[संपादन]