बटाट्याच्या काचऱ्या
Appearance
(बटाटाच्या काचर्या या पानावरून पुनर्निर्देशित)
बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून | |
प्रकार | उपवासाचे पदार्थ, फराळ |
---|---|
मुख्य घटक | बटाटे |
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | तेल, चटणी, मीठ, मिरेपूड |
बटाट्याच्या काचऱ्या (Potato Wafers) म्हणजे बटाट्याचे तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.
साहित्य
[संपादन]- बटाटे - दोन ते तीन नग
- कांदा - एक नग
- तेल,
- जिरे,
- मोहरी,
- हळद,
- हिंग,
- मीठ - चवीनुसार,
- काळा मसाला किंवा लाल तिखट,
- धणे-जिरे पूड.
- एक छोटा चमचा साखर.
कृती
[संपादन]प्रथम बटाटा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यावी. कांदा आणि बटाटा बारीक चिरून घ्यावा. नॉनस्टिक पॅन घेऊन त्यात तेल टाकावे. तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी. हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात बटाटा घालावा. मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.