Jump to content

प्लेयर्स (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लेयर्स
दिग्दर्शन अब्बास–मस्तान
निर्मिती पप्पू वासवानी
कथा सुदीप शर्मा (संवाद)
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन
सोनम कपूर
बिपाशा बासू
नील नितीन मुकेश
ओमी वैद्य
बॉबी देओल
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ जानेवारी २०१२
वितरक व्हायाकॉम ८
अवधी १६३ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया ४५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १६ कोटी


प्लेयर्स हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. २००३ सालच्या द इटालियन जॉब ह्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. ह्याची कथा संपूर्णपणे इटालियन जॉबवरून घेतली असली तरी प्रसंग व स्थाने वेगळी दाखवली आहेत. अब्बास–मस्तान ह्या जोडगोळीने दिग्दर्शन केलेल्या प्लेयर्समध्ये बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन, सोनम कपूर, बिपाशा बासू, नील नितीन मुकेश, बॉबी देओल, विनोद खन्ना, ओमी वैद्य, सिकंदर खेर इत्यादी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केले असून आफताब शिवदासानी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत चमकला आहे.

प्लेयर्सचे कथानक भारत, रशियान्यू झीलंड ह्या तीन देशांमध्ये घडते व त्यामध्ये चोरी, शह, काटशह इत्यादी रोमांचकपूर्ण पटकथा आहेत. ह्यामधील काही चित्रीकरण उत्तर ध्रुवावर देखील केले गेले होते.

प्लेयर्स प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये व टीकाकारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ह्या चित्रपटाची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. परंतु २०१२ सालामधील पहिला प्रदर्शित झालेल्या प्लेयर्सला तिकीट खिडकीवर अपयशाचा सामना करावा लागला. अति ताणलेली कथा हे टीकाकारांच्या मते अपयशाचे मोठे कारण होते. ह्याचबरोबर वर्षामध्ये सर्वप्रथम प्रदर्शित झालेला चित्रपट आपटण्याचा इतिहास चालूच राहिला.

बाह्य दुवे

[संपादन]