ओमी वैद्य
ओमी वैद्य हा भारतीय अमेरिकन नट आहे आणि त्याची ओळख म्हणजे सन २००९ मध्ये त्याने ३ इडियट्स मध्ये चतुर रामलिंगम किंवा दी सायलंसरची केलेली भूमिका, त्याने तो खूप प्रशिद्द झाला.[१] याशिवाय त्याने दोन शॉर्ट फिल्म डायरेक्ट केलेल्या आहेत तसेच एडिटर म्हनुनही काम केलेले आहे. तो दूरचित्रवाणीवरील बऱ्याच कार्यक्रमात आणि व्यावसायिक बांबीत ही पाहावयास मिळाला आहे. ३ इडियट्ससोबतच दिल तो बच्चा है जी, देसी बॉइझ, प्लेयर्स इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील तो चमकला आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]जोशुय ट्री इन युक्का व्हॅली, कॅलिफोर्निया येथे वैद्य यांचा जन्म झाला. यांनी लॉस एंजिल्स काउंटी हाय स्कूल मधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सांता क्रुझ येथे दोन वर्षे काम केले. त्यांना नंतर न्यू यॉर्क विध्यापीठातील तिश्च स्कूल ऑफ द आर्ट मध्ये बदलले. तेथे ते ऑनरने ग्राजुएट झाले. अलीकडेच वैद्य यांनी आपल्या पार्श्वभूमी संबंधी विचार व्यक्त केलेत
मी सध्या लॉस अंजिल्स USA मध्ये राहातो, तेथेच मी वाढलो, पण प्रत्येक वर्षी भारतात येण्याची माझी योजना असते. माझे मूळं घर गोवा आहे तरीसुद्दा माझा उत्कर्षाचा काळं होता तेव्हा मी नियमित मुंबईत येत होतो. मी ६ वर्षाचा होतो तेव्हा पासून मराठी मंडळांचे नाटकात आणि कांही USA मधील इंग्लिश प्ले मध्ये अभिनय करतोय. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच मी बरेचसे अभिनयाचे धडे घेतले आणि त्यातूनच मी सीनेमाकडे अभिनयाच्या दृष्टीने स्वताहला घडविण्यासाठी वळलो. मी NYU सिनेमा शाळेत गेलो आणि सिनेमा तयार करणे, कलाकार निवड करणे, अभिनय करणे इ॰ बाबी शिकलो. स्टेजवर बोलणे कसे असावे हे मी शिकलो. NYU मधून पदवीधर झाल्यानंतर मी परत लॉस अंजिल्सला गेलो आणि T.V. मालीकासाठी आणि सिनेमासाठी कलाकारांचे निवडीचे काम करू लागलो.
व्यक्तीगत जीवन
[संपादन]२२-८-२००९ रोजी मीनल पटेल यांचाबरोबर वैद्य यांचे लग्न झाले. २४-६-२०१५ रोजी हे एका मुलाचे वडील झाले.[२]
कारकीर्द
[संपादन]शिक्षण संपल्यानंतर वैद्य एका मध्यस्थाकडे दूरदर्शनवरील कार्यक्रमात आणि व्यावसायिक मालिकात लहान लहान भूमिका करू लागले. “Arrested Development” या मालिकेत लहानसी भूमिका मिळाल्यानंतर, या मालिकेच्या दिग्दर्शकांनी यांना “The Officer” या मालिकेतील सादीक भूमिकेसाठी निवड चाचणी देण्यास सांगितले. “E-Mail Surveillance” आणि “Fun-Run” या दोन भागातच सादिक भूमिका चित्रित झाली. पण विडियो वरील एशिया तिल Rap प्रकारात ऊंची स्थान गाठलेल्या बोहमिय यांनी गायलेल्या “कुर्ती” या पंजाबी सुपर हिट झालेल्या गाण्यावरील अदाकारीने वैद्य खूपच प्रकाशित झाले. बोहमिय यांना “King of Punjabi Rap” म्हटलं जात.
थ्री इडियट्स (३ इडियट्स)
[संपादन]वैद्य यांची अतिशय गाजलेली आणि स्मरणात राहाणारी भूमिका म्हणजे सन २००९ मध्ये बॉलीवुडचे ३ इडियट्स या सिनेमातील सहायक अभिनेता म्हणून केलेली चतुर रामलिंग ( द सायलेंसर) भूमिका! समालोचकांनी त्याच्या अदाकारीला भरभरून दाद दिली.[३] वैद्य मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी या भूमिकेसाठी मुलाखत दिली होती. पहिल्या मुलाखतीतून ते पुढे सरकल्यानंतर त्यांना दुसऱ्या मुलाखतीच्या वेळी “लगे रहो मुन्ना भाई”चे संवाद वाचण्यास सांगितले होते. वैद्य म्हणतात की “मी फक्त अंदाजाने ते संवाद समजलो, नक्की काय शब्द बोलायचे आहेत हे कळत नव्हते,” नंतर चतुर हा भाडे तत्त्वाने घेतला होता, त्याने संगितले हिंदी शिकू नको,हिंदी फिल्म ही पाहू नको,जड होईल !
वैद्य या फिल्म मधील सर्व यश मुंबईतील वातावरण व तेथील संयोजकांना देतात. “येथे हॉलीवुड सारखे नाही तर वैयक्तिक संपर्क आहे. येथे मायेची ऊब आहे काळजी आहे. येथे जादा वेळ ध्यावी लागत नाही त्याने खर्च ही होत नाही. मी मुळातच बॉलीवुड मधील हे काम म्हणजे आव्हान आहे असे मानले. राजू आणि अभिजीत जोशी यांना देखील ही भूमिका पडद्यावर घेऊन येण्यापर्यंतचे फार मोठे यश जाते”. त्यांनी हा सिनेमा पदर्शित होईपर्यंत धीर दिला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना म्हणालो मी एक दोन मुलाखती देऊ का त्यावर ते उसळले आणि म्हणाले तुला कोणी ओळखत नाही. फिल्म प्रदर्शित होईपर्यंत असे काहीही करू नको. माझ्या भूमिकेने सर्व नियोजित प्रेक्षाकाना अचंबित केले. नंतर वाद्य बोलले की मी जेव्हा ३ ईडियट्सची प्रीमियर पाहीली तेव्हा मला कोणीही ओळखले नाही.[४] क्षणभर मी खिन्न झालो पण सिनेमा संपला तेव्हा मला सिनेमा ग्रहातून बाहेर पडणंही अतिशय कठीण झालं ! प्रेक्षकाकडुन मिळालेल्या प्रम भावना, केलेले कौतुक याने मी खूपच भारावलो. अलीकडे मी रस्त्यावरून चालत असेन तर लोक जवळ येतात हसत मुखाने हातात हात देतात. कितीतरी आनंद होतो मनाला !
बक्षीस (अवार्ड्स)
[संपादन]३ इडियट्स या फिल्म साठी उत्कृष्ट विनोदी भूमिका, मोस्ट प्रोमिसिंग न्यूकमर (पुरुष), स्टार डेबूट ऑफ द एर ही बक्षिसे मिळाली आहेत.[५]
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ओमी वैद्य चे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "ओमी वैद्य: ४ था इडियट".
- ^ "३ इडियट्स मधील ओमी वैद्य उर्फ चतुर रामलिंग वडील झाले".[permanent dead link]
- ^ "ओमी वैद्य - ३ इडियट्स सिनेमातील वास्तविक स्टार". 2016-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-27 रोजी पाहिले.
- ^ "३ इडियट्स सिनेमा मधील कलाकारांची यादी".
- ^ "स्टार स्क्रीन पुरस्कार २०१० विजेते".