पोंतियानाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोंतियानाक
शहर
कोटा पोंतियानाक
डावीकडे वरपासून घड्याळ्याच्या दिशेने: शहरातील बाजार; उत्तर पोंतियानाक घोडेस्वारी स्मारक; सरकारी इमारती; पारंपारिक मलय घर; बोर्निओमधील पक्ष्यांचे पारंपारिक शिल्प; पोंतियानाकचे द्वार; एंग्गांग बदक शिल्प
डावीकडे वरपासून घड्याळ्याच्या दिशेने: शहरातील बाजार; उत्तर पोंतियानाक घोडेस्वारी स्मारक; सरकारी इमारती; पारंपारिक मलय घर; बोर्निओमधील पक्ष्यांचे पारंपारिक शिल्प; पोंतियानाकचे द्वार; एंग्गांग बदक शिल्प
Flag of पोंतियानाकOfficial seal of पोंतियानाक
Nickname(s): 
कोटा खातुलिस्तिवा (विषुववृत्तीय शहर)
Motto(s): 
पोंतियानाक बेर्सिनार (तेजस्वी पोंतियानाक)
पश्चिम कालीमंतानमध्ये स्थान
गुणक: 00°01′14″S 109°20′29″E / 0.02056°S 109.34139°E / -0.02056; 109.34139गुणक: 00°01′14″S 109°20′29″E / 0.02056°S 109.34139°E / -0.02056; 109.34139
देश साचा:INA
प्रदेश कालीमंतान
प्रांत West Kalimantan
पोंतियानाकच्या सुलतानाने केलेली स्थापना २३ ऑकटोबर, १७७१
डच लोकांची वसाहत ५ जुलै, १७७९
नगरपालिकेची स्थापना १९५३
सरकार
 • प्रकार नगरपालिक
 • महापौर एदी रुस्दी कामतोनो
क्षेत्रफळ
 • शहर ११८.३२ km (४५.६८ sq mi)
Elevation
१ m (३ ft)
Lowest elevation
०.८ m (२.६ ft)
लोकसंख्या
 (२०२२चा अंदाज)
 • शहर ६६९७९५
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
  [१]
एरिया कोड (+६२) ५६१
Vehicle registration KB
संकेतस्थळ pontianakkota.go.id

पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते.

हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [२] [३] २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती. [१]


इतिहास[संपादन]

१९२० च्या सुमारास पोंतियानाक
सुमारे १९२०मध्ये पोंतियानाकचा सुलतान स्यारीफ मुहम्मद अल्काद्री आणि त्याचे कुटुंब

पोंतियानाकची स्थापना कपुआस नदीच्या मुखावर एक लहान मलय मासेमारी गाव म्हणून झाली. त्यानंतर अनेक शतके ते पोंतियानाक सल्तनतची राजथानी होते. पोंतियानाक सल्तनत आणि डच सरकार यांच्यातील तहाद्वारे पोंतियानाकचा डच ईस्ट इंडीजमध्ये समावेश करण्यात आला. वसाहतकाळातत, पोंतियानाक हे डच ईस्ट इंडीजच्या सरकारी मुख्यालयांपैकी एक होते.

कालांतराने जपानने डच ईस्ट इंडीजवर काबीज केले तेव्हा त्यांनी येथील सुलतानासह अनेक मलय सरदार, अधिकारी आणि असंख्य इतर लोकांना कापून काढले. जपानच्या शाही आरमाराने मंडोरच्या नरसंहारासह अनेक ठिकाणी हे हत्याकांड चालवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानने शरणागती पत्करल्यावर पोंतियानाक इंडोनेशिया प्रजासत्ताकच्या पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी झाले

पोंतियानाक नगरगृह
पश्चिम कालीमंतन परिषद (DPRD) इमारत
पोंतियानाकमध्ये गवई दयाक उत्सव

पोंतियानाकची बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम (६३.४%) असून उर्वरित बौद्ध (२३.२%), कॅथोलिक (९.१%), प्रोटेस्टंट (३.२%), कन्फ्यूशियन (१.२%), हिंदू (०.१%) आणि इतर (०.१%) आहेत. [४] बहुसंख्य मुस्लिम हे मलय, जावानीज, मदुरीज इ. आहेत. बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशियन धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक चिनी इंडोनेशियन आहेत, तर बरेच चीनी देखील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. दयाक लोक कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट धर्माचे तसेच स्थानिक प्राचीन धर्माचेही पालन करतात. काही दयाक स्थानिक लोक धर्म कहरिंगनचे देखील पालन करतात. तथापि, इंडोनेशियन सरकार कहारिंगनला धर्म म्हणून मान्यता देत नाही आणि म्हणून कहरिंगन लोकांचे वर्गीकरण हिंदू असे होते.

पोंतियानाकचा मध्यवर्ती भाग

हवाई वाहतूक[संपादन]

सुपादिओ विमानतळ

सुपादिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोंतियानाक आणि पश्चिम कालीमंतानचा मुख्य विमानतळ आहे. याची बांधणी जे दुसऱ्या महायुद्धात जपानने केली. हा विमानतळशहरापासून १७ किमी अंतरावर कुबू राया भागात आहे.

जुळी शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Badan Pusat Statistik, Jakarta, 2023, Kota Pontianak Dalam Angka 2023 (Katalog-BPS 1102001.6171)
  2. ^ Omed, Kata (2020-05-25). "Daftar 10 Kota Besar di Kalimantan". KATA OMED (इंग्रजी भाषेत). 2021-06-19 रोजी पाहिले.
  3. ^ Badan Pusat Statistik, Jakarta, 2021.
  4. ^ "Peringatan". sp2010.bps.go.id. 2018-02-15 रोजी पाहिले.