पेढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेढा हा खवा आणि साखर यापासून बनवला जातो.त्यात केशर,खाण्याचा रंग,जायफळ इत्यादी पदार्थही टाकतात. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, पुणे, सातारा, कोल्हापुर ही गावे पेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सातारचे पेढे हे "कंदी पेढे" म्हणून तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे"(तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यामधे "चितळे बंधू", कोल्हापुरात "दगडू बाळा भोसले" हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.खव्यापासून बनवलेले आणि मलईपासून बनवलेले असे दोन प्रकारचे पेढे इथे मिळतात.खव्यापासून बनविलेल्या पेढ्यास नुसते 'पेढा' तर मलईपासून बनविलेल्या पेड्यास 'मलई पेढा' असे म्हणतात.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.