खवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खवा

म्हशीचे दूध लोखंडाच्या कढईत गरम करून त्यास सतत ढवळत जातात व आटवितात. सततच्या ढवळण्याने दूध, उष्णतेमुळे जळत नाही. हे घट्ट झालेले दूध म्हणजे खवा.तो साधारण किंचीत पिवळसर पांढरा असतो. यात चरबी(फॅट) चे प्रमाण अत्युच्च असते.या पदार्थाचा वापर साखर व रंग घालून मिठाई करण्यासाठी करतात. साधारणतः १ लिटर चांगल्या दुधाचा १२० ते १३० ग्राम खवा बनतो.काही प्रदेशात याला मावा असेही म्हणतात.खव्यापासून पेढे, गुलाबजाम इ. पदार्थ तयार करतात.

खव्यापासून तयार केलेले गुलाबजाम


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.