पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॅराडॉक्सेस ऑफ एम्पावरमेंट: डेव्हलपमेंट, जेंडर ॲन्ड गव्हरनन्स इन नियोलिबरल इंडिया[१] हे भारतीय मानववंशशास्त्रज्ञ व स्त्रीवादी आराधना शर्मा[२] यांनी लिहिलेले पुस्तक आहे. २००८ मध्ये हे पुस्तक स्त्रीवादी प्रकाशनगृह असणाऱ्या 'जुबान' यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

महत्त्वाचे मुद्दे[संपादन]

या पुस्तकाने भारतातील उत्तर प्रदेश या राज्याचे विस्तृत मानववंश शास्त्रीय संशोधन केलेले आहे. राज्य, विकास, लिंगभाव, सब-आल्टर्न विषय आणि नवउदारमतवादी भारतातील लोकप्रिय आंदोलने अशाप्रकारच्या कमी बोलल्या जाणाऱ्या विषयांची अभ्यासात्मक मांडणी करण्याचा प्रयत्न लेखिका या पुस्तकामध्ये करतात. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या, उदारमतवादाने ज्यांना परिघावर ठेवले ते घटक आपले हे वगळलेपण कसे समजून घेणार, तसेच याला कसे आव्हान देणार व त्याचे कसे विश्लेषण करणात? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची त्यांची मांडणी केंद्रीभूत झालेली सिसते.

स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनामुळे शासनप्रणालीमध्ये झालेला बदल, विकासाचे विचारप्रवाह आणि विषयाची मांडणी यामध्ये झालेला बदल याची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.

योगदान[संपादन]

या पुस्तकाचे ॲकॅडमिक क्षेत्रात चांगले स्वागत करण्यात आले.

संदर्भ सूची[संपादन]