पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेसचा फलक
पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेसचा मार्ग

पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. गरीब रथ ह्या किफायती दरात पूर्णपणे वातानुकुलीत प्रवाससेवा पुरवणाऱ्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक ह्यांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेसला पुणे ते नागपूर दरम्यानचे ८९० किमी अंतर पार करायला १५ तास व ४५ मिनिटे लागतात.

तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२११३ पुणे – नागपूर १७:४० ०९:२५ सोम, बुध, शुक्र
१२११४ नागपूर – पुणे १८:३५ ०९:४५ मंगळ, गुरु, शनि

मार्ग[संपादन]

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे रेल्वे स्थानक
DD दौंड ७६
ANG अहमदनगर १६०
MMR मनमाड ३१३
BSL भुसावळ ४९७
AK अकोला ६३७
BD बडनेरा ७१६
WR वर्धा ८११
NGP नागपूर ८९०

बाह्य दुवे[संपादन]