रॉयल एशियाटिक सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली सर जेम्स मॅकेन्टोश यांनी बॉम्बे लिटररी सोसायटीची (आताची एशियाटीक सोसायटी) स्थापना केली होती. १८३० साली बांधण्यात आलेल्या टाऊन हॉलच्या बिल्डिंगमध्ये या सोसायटीचा कारभार हलवण्यात आला. तेव्हापासून येथूनच सोसायटीचा कारभार चालतो आहे.

गंथालयाच्या डागडुजीला हेरिटेज कमिटीची मान्यता आवश्यक आहे. राज्य सरकारने गंथालयाची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे कमिटीला कळवले होते. त्यासाठी, राज्य सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये केली आहे. या निधीतून एशियाटिक सोसायटी आणि ओल्ड कस्टम हाऊसची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. मात्र, कमिटीकडून मान्यतेचे सोपस्कार पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने गंथालयाची डागडुजी रखडली आहे.


दुमिर्ळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पशिर्यन, अरेबियन, मराठी, गुजराथी, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत.

मुंबईचे शिल्पकार मानले गेलेल्या नाना शंकर शेठ यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे. 

1994 मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले , तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युटीआयमध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आथिर्क संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली. [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. 'एशियाटिक'चे अश्रू[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

बाह्य दुवे[संपादन]