नेली साक्स
नेली साक्स | |
---|---|
जन्म |
१० डिसेंबर १८९१ बर्लिन, जर्मन साम्राज्य |
मृत्यू |
१२ मे, १९७० (वय ७८) स्टॉकहोम, स्वीडन |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
स्वाक्षरी |
नेली साक्स (हिब्रू: שמואל יוסף עגנון; १० डिसेंबर १८९१ - १२ मे १९७०) ही एक जर्मन कवयित्री होती. ज्यू धर्मीय असलेल्या साक्सचा जन्म बर्लिनमधील एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला. खराब प्रकृतीमुळे साक्सचे शिक्षण घरीच झाले. १९३० च्या दशकामध्ये जर्मनीमध्ये नाझी पक्षाची सत्ता आल्यानंतर हिटलरने सर्व ज्यू व्यक्तींना छळछावण्यांमध्ये डांबण्याची योजना रचली. ह्यामुळे साक्सला मोठा मानसिक धक्का बसला. १९४० साली घनिष्ट मैत्रीण सेल्मा लॅगरल्यॉफ हिच्या मदतीने साक्स व तिच्या आईने जर्मनीहून स्वीडनला पळ काढला. स्टॉकहोममध्ये राहत असताना नाझींच्या आठवणींमुळे साक्सचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले व ती अनेक वर्षे मानसोपचार रुग्णालयामध्ये दाखल होती. इस्पितळामधून तिने आपले लिखाण चालूच ठेवले परंतु तिची मानसिक प्रकृती परत पुर्ववत झाली नाही. १९७० साली साक्स स्टॉकहोम येथे मृत्यू पावली.
साक्सला १९६६ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक (श्मुएल योसेफ अग्नोनसोबत विभागून) मिळाले होते.
बाह्य दुवे
[संपादन]मागील मिखाईल शोलोखोव |
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते १९६६ |
पुढील मिगेल आंगेल आस्तुरियास |