नेर्ले (वैभववाडी)
नेर्ले
नेर्ले | |
|---|---|
|
गाव | |
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| जिल्हा | सिंधुदुर्ग |
| तालुका | वैभववाडी |
| क्षेत्रफळ | |
| • एकूण | ६४६.०९ ha (१,५९६.५२ acre) |
| लोकसंख्या (2011) | |
| • एकूण | ६७८ |
| भाषा | |
| • अधिकृत | मराठी |
| प्रमाणवेळ | UTC+5:30 (IST) |
| वाहन नोंदणी | MH-07 |
नेर्ले हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यात वसलेले एक प्राचीन व डोंगराळ गाव आहे. हे गाव सह्याद्री पर्वताच्या टेकड्यांच्या कुशीत वसलेले असून चारही बाजूंनी दाट जंगलाने वेढलेले आहे. गावाच्या पश्चिम आणि उत्तरेला रत्नागिरी जिल्ह्याची सीमा लागते. वैभववाडी तालुका ठिकाण येथून अंदाजे २८ किमी अंतरावर आहे.







गावाभोवती साग, बांबू, ऐन, किंजळ या वृक्षांची घनदाट वनसंपदा आढळते.
भौगोलिक स्थान
[संपादन]नेर्ले गाव सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील उतारांवर स्थित आहे. संपूर्ण परिसरात दाट जंगल, टेकड्या आणि जामदा नदीचा परिसर आढळतो.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे अतिवृष्टी होते. शरद ऋतूत वातावरण सुखद असते. हिवाळ्यात येथील तापमान कमी असते व धुके पडते. उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. पावसाळ्यात येथे भात व नाचणी शेती केली जाते.
इतिहास व लोकजीवन
[संपादन]नेर्ले हे साधारण ८०० वर्ष जुने गाव मानले जाते. विविध जातींचे लोक येथे आपापसांत एकोप्याने राहतात. गावातून भुईबावडा–पाचल हा जिल्हा मार्ग जातो. पारंपरिक पिकांमध्ये भात व नाचणी तर अलीकडील काळात काजू व आंबा लागवडीचे प्रमाण वाढले आहे.
पाणीस्रोत
[संपादन]नेर्ले–रत्नागिरी सीमेवर जामदा नदी वाहते. नदीला बारमाही पाणी असते. गावातील सार्वजनिक व खाजगी विहिरी आणि बोअरवेल हे मुख्य पाणीस्रोत आहेत.
वाड्या व लोकसंख्या
[संपादन]२०११ नुसार लोकसंख्या : ६७८ घरटी : १९०
- पुरुष : ३०२
- महिला : ३७६
- लिंगगुणोत्तर : १२४५ महिला / १००० पुरुष
- साक्षरता : ७१% – ७६%
गाव चार वाड्यांनी बनलेले आहे.
देवस्थान
[संपादन]गावात स्वयंभू व अतिप्राचीन श्री देव धावजी याचे मंदिर आहे. होळी, दसरा आणि सप्ताह हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.
शैक्षणिक सुविधा
[संपादन]- Z.P. प्राथमिक शाळा (इयत्ता १ ते ४)
- छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (इयत्ता ५ ते १२)
जांभवडे, तिरवडे, उपळे आणि रत्नागिरी सीमावर्ती गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- जामदा नदीकाठावरील चंद्रकोराकार खडक
- नदीकिनारी असलेली गुहा सदृश रचना
- श्री देव धावजी मंदिर
वन्यजीव
[संपादन]गावाभोवती दाट जंगल असल्याने येथे अनेक प्रकारचे वन्यजीव आढळतात.
प्रमुख जंगली प्राणी
[संपादन]- वाघ
- बिबट्या
- रानडुक्कर
सरपटणारे प्राणी
[संपादन]- नाग
- अजगर
- नानेटी
- दुरक्या घणस
- धामण
- तस्कर
- रुका
- कुकरी
- कवड्या
गावातील तरुण बंटी पाटील यांनी आजपर्यंत शेकडो सापांचे रेस्क्यू करून अनेक जीव वाचवले आहेत.
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
बाह्य दुवे
[संपादन]ANANT PHONDKE (चर्चा) १९:३६, २८ नोव्हेंबर २०२५ (IST)