निहे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निहे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हे गाव उत्तर कोकणात मोडते.

  ?निहे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
समशीतोष्ण (Köppen)
३० °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "३" °F)
• ३३ °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "३" °F)
• २३ °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२" °F)
जवळचे शहर पालघर
तालुका/के पालघर
संसदीय मतदारसंघ पालघर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• महा ४८
संकेतस्थळ: [http://जय हनुमान मंदिर,निहे,

https://goo.gl/maps/aQpdMptSRBu ]

भौगोलिक स्थान[संपादन]

पालघरहून मनोर राज्यमहामार्गाने मासवणमार्गे काटाळे गावानंतर हे गाव वसलेले आहे. पालघर ते निहे १९ किमी अंतर आहे.पालघरवरून येथे येण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे.डमडम,जीप तसेच अॉटोरिक्शासुद्धा पालघर रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी उपलब्ध असतात.

हवामान[संपादन]

येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण तर हिवाळ्यात थंड असते. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात पाऊस पडणारे दिवस सोडले तर इतर दिवशी हवा उष्ण व दमट असते.

लोकजीवन[संपादन]

येथे मुख्यतः कुणबी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहत आहेत. खरीप हंगामात भातशेती, नागलीशेती केली जाते. पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या रब्बी हंगामात घेतल्या जातात. घरगुती वापरासाठी कुक्कुटपालन केले जाते तसेच काही प्रमाणात दुग्धव्यवसाय सुद्धा केला जातो. बाजाररहाटासाठी मनोर किंवा पालघर येथे जावे लागते. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक स्वच्छता, रस्ते वीजपुरवठा, आरोग्य पाहिले जाते. प्राथमिक शिक्षणाची गावात सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी मासवण गावात तर उच्च शिक्षणासाठी पालघरला जावे लागते.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc