Jump to content

निघोज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निघोज, अहमदनगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

निघोज हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील गाव आहे.

भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या

[संपादन]

निघोज हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील २७३५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २१०९ कुटुंबे व एकूण १०३८५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर अहमदनगर ५१ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५४१० पुरुष आणि ४९७५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९२३ असून अनुसूचित जमातीचे ४१५ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५८३५५ [] आहे.

साक्षरता

[संपादन]
  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७०४८ (६७.८७%)
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ४०१३ (७४.१८%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ३०३५ (६१.०१%)

पर्यटनस्थळे

[संपादन]

'निसर्गाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार - रांजणखळगे
निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुद्धा आटत नाही. अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे ह्या कुंडांची निर्मिती झाली असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

कुकडी नदीच्या पात्रात साधारण 200 मीटर लांब व 60 मीटर रुंद इतक्या भागात खडकामध्ये रांजणखळग्यांचे विविध आकार आपणास पहावयास मिळतात. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत ‘कुंड’ म्हणतात. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या छानशा कुंडांमुळे कुकडी नदीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.कुकडीचे रांजणखळगे देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करीत असून भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकही येथे येत असतात. रांजणखळग्यांची निर्मिती कशी झाली, कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली ह्या सर्व बाबींचा अभ्यास करण्याकरीता जगभरातील तज्ञमंडळी आवर्जून भेट देत आहेत. रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील करण्यात आलेली असल्याने त्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरलेली आहे. आपल्या महान महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले, हेमाडपंथी प्राचिन मंदिरे अशा अनेक अद्भूत अविष्कारांप्रमाणेच रांजणखळग्यांचे आकर्षण जगभरातील पर्यटकांना, अभ्यासकांना, तज्ञांना भूरळ पाडत आहे.

रांजणखळग्यांच्या परिसरात म्हणजेच कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस मळगंगा देवीची दोन मंदिरे आहेत आणि या दोन मंदिरांना जोडणारा राज्य सरकारच्या वतीने बांधण्यात आलेला झूलता पूल देखील बघण्यासारखा आहे. पूलाच्या मध्यभागी उभे राहून कुकडी नदीचे दर्शन नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस असलेल्या रांजणखळग्यांमुळे विलोभनीय दिसते. निसर्गाचा हा चमत्कार तासन् तास बघत रहावा वाटतो. निघोज गावात मळगंगा माता मंदिराबरोबरच कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राम मंदिर बघण्यासारखी आहेत. दरवर्षी भरणाऱ्या मळगंगा मातेच्या जत्रेस लाखो संख्येने भक्तगण मोठ्या भक्तीभावाने मळगंगा मातेच्या दर्शनासाठी येत असतात.

निघोजपासून साधारण 25 कि.मी.अंतरावर निसर्गरम्य चिंचोली गाव आहे. ह्या गावात आपल्याला असंख्य प्रमाणात मोर बघावयास मिळतात. हे गाव मोराची चिंचोली ह्या नावाने प्रसिद्ध आहे.

ग्रामपंचायत कार्यालय

[संपादन]

ग्रामपंचायतमध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध आहे तसेच गावकऱ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सामान्य सुविधा ग्रामपंचायततर्फे पुरवल्या जातात. गावकऱ्यांना विविध दाखले देणे, त्याच्याकडून विविध कर गोळा करणे ई. कामे ग्रामपंचायत मध्ये केली जातात.

शैक्षणिक सुविधा

[संपादन]

गावात १३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, १३ शासकीय प्राथमिक शाळा, ४ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा, ४ शासकीय माध्यमिक शाळा, १ शासकीय उच्च माध्यमिक शाळा, आणि सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहेत. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पारनेर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय पारनेर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, वैद्यकीय महाविद्यालय पारनेर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक पारनेर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा टाकली ढोकेश्वर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

वैद्यकीय सुविधा

[संपादन]
  • शासकीय

गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र, १ प्रसूति व बालकल्याण केंद्र, १ क्षयरोग उपचार केंद्र, १ कुटुंबकल्याण केंद्र, १ अंगणवाडी पोषण आहार केंद्र, आशा स्वयंसेविका आणि १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे.

  • अशासकीय

गावात १० अशासकीय दवाखाने आणि १२ औषधाचे दुकाने आहे.

संपर्क व दळणवळण

[संपादन]

गावात पोस्ट ऑफिस, सार्वजनिक दूरध्वनी केंद्र, मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा, ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे.

बाजार व पतव्यवस्था

[संपादन]

गावात २ एटीएम (स्वयंचलित चलन वितरण यंत्र), १ व्यापारी बँक, १२ सहकारी बँक उपलब्ध आहे. गावात शेतकी कर्ज संस्था आणि स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान आणि आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. गावात उप-कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध आहे.

धार्मिक स्थळे

[संपादन]

गावात मळगंगा देवीचे सुप्रसिद्ध मंदिर व इतर १६ इतर वेगवेगळी मंदिरे आहेत. आणि २ मश्जीद आहेत. निघोज कुंड- पाण्याच्या ओघामुळे नदीमध्ये तयार झालेले गोलाकार आकाराचे खड्डे आणि काठावर असलेले मंदिर हे इथले प्रसिद्ध पर्यटक स्थान आहे.

पाणी

[संपादन]
  • पिण्याचे पाणी

गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा, विहिरीच्या पाण्याचा, हॅन्डपंपच्या पाण्याचा, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा, झऱ्याच्या पाण्याचा, नदी / कालव्याच्या पाण्याचा, आणि तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे.

  • शेतीसाठी पाणी

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • कालवे: १४०३
  • विहिरी / कूप नलिका: ३१०
  • इतर: २८७

गावामध्ये घरगुती वापरासाठी २४ तास आणि शेतीच्या वापरासाठी ८ तास वीज उपलब्ध आहे.

स्वच्छता

[संपादन]

गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे आणि सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.

जमिनीचा वापर

[संपादन]

निघोज ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: २४२
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: ९०
  • पिकांखालची जमीन: २४०३
  • एकूण कोरडवाहू जमीन: २०००
  • एकूण बागायती जमीन: ४०३

उत्पादन

[संपादन]

निघोज या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते- उस, कलिंगड, कांदा इत्यादी.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]