नायजर-काँगो भाषासमूह
Appearance
नायजर-कॉंगो भाषासमूह हा आफ्रिका खंडामधील एक भाषासमूह जगातील मूळ भाषाकुळांपैकी एक आहे. भाषिक क्षेत्रफळ, लोकसंख्या तसेच भाषांच्या संख्येबाबतीत हा आफ्रिकेमधील सर्वात मोठा भाषासमूह आहे.
प्रमुख भाषा
[संपादन]खालील नायजर-कॉंगो भाषा आफ्रिकेमधील एक किंवा अधिक देशांच्या अधिकृत भाषा आहेत.
- स्वाहिली भाषा - टांझानिया, केन्या, रवांडा, कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक
- कोमोरियन भाषा - कोमोरोस
- चेवा भाषा - मलावी, झांबिया
- किन्याऱ्वान्डा भाषा - रवांडा
- किरुंडी भाषा - बुरुंडी
- स्वाती भाषा - दक्षिण आफ्रिका, स्वाझीलँड
- सोथो भाषा - दक्षिण आफ्रिका, लेसोथो
- दक्षिण न्देबेले भाषा - दक्षिण आफ्रिका
- कौसा भाषा - दक्षिण आफ्रिका
- झुलू भाषा - दक्षिण आफ्रिका
- शोना भाषा - दक्षिण आफ्रिका
- त्स्वाना भाषा - बोत्स्वाना, दक्षिण आफ्रिका
- वेंडा भाषा - दक्षिण आफ्रिका
- त्सोंगा भाषा- दक्षिण आफ्रिका
- योरुबा भाषा- नायजेरिया
- इग्बो भाषा - नायजेरिया
- फुला भाषा
सर्व नायजर-कॉंगो भाषा लॅटिन वर्णमाला वापरतात.