नगावे
?नगावे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .२७३ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
५४२ (२०११) • १,९८५/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | खारवी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०११०४ • +०२५२५ • एमएच४८ |
नगावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर माकुणसार चेकनाक्यावर डावीकडे आगरवाडी मार्गाने गेल्यानंतर कोचरे गावानंतर हे गाव लागते.सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ७.८ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ५४२ लोकसंख्येपैकी २६१ पुरुष तर २८१ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.२८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.०२ आहे तर स्त्री साक्षरता ७८.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ९.७८ टक्के आहे. मुख्यतः खारपाटील समाजातील लोक येथे राहतात.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]सफाळे, कर्दळ, माकणेकपासे,विराथन खुर्द, नगावेपाडा, चटाळे, भादवे, मथाणे, वेढी, शिलटे, मांजुर्ली ही जवळपासची गावे आहेत.नगावे गाव गिराळे गावासह गिराळे ग्रामपंचायतीमध्ये येते.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html