Jump to content

नंदिनी शंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदिनी शंकर
जन्म नंदिनी
१ जुलै १९९३
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा व्हायोलिनवादक
मूळ गाव मुंबई
पदवी हुद्दा चार्टर्ड अकाउंटंट
धर्म हिंदू
आई डॉ. संगीता शंकर
नातेवाईक डॉ. एन.राजम, रागिणी शंकर
संकेतस्थळ
www.nandinishankar.com


नंदिनी शंकर ( जन्म : १ जुलै १९९३, मुंबई) ह्या एक भारतीय व्हायोलीन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलीन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांची कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम ह्यांची नात आहेत.[]

सुरुवातीचे आयुष्य

[संपादन]

नंदिनी शंकर ह्यांना संगीतचा वारसा त्यांच्या घरातूनच लाभला आहे. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या आईकडून व्हायोलीन शिकायला सुरुवात केली आणि पहिली सार्वजनिक मैफील वयाच्या आठव्या वर्षी सादर केली. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी पूर्णपणे स्वतःची एकल प्रस्तुती केली. त्या गायकी अंगाचे व्हायोलीन वाजवतात.[]

शिक्षण

[संपादन]

नंदिनी शंकर ह्यांनी कॉमर्समधील पदवी प्राप्त केली आहे आणि त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी संगीत विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या सध्या मुंबईत राहतात. त्यांनी गायनाचे सुद्धा धडे घेतले आहेत.[]

कारकीर्द

[संपादन]

त्यांनी २०१६ साली कार्नेजी हॉल,न्यू यॉर्क आपली कला सादर केली.त्यांनी अमेरिका, कॅनडा, न्यू झीलंड[],इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, हंगेरी, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत.[] त्यांनी युरोपीया, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव,[] यक्ष(महोत्सव), सप्तक फेस्टिव्हल ऑफ म्युझिक, आरोही फॉर पंचम निषाद, आयटीसी एसआरए संगीत संमेलन, नेदरलँड्सचा मेरू महोत्सव, हेमा मालिनी ह्यांनी आयोजित केलेला जया स्मृती, टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स, भिलवाडा सूर संगम, टी.एन.कृष्णन महोत्सव, दिल्ली अंतरराष्ट्रीय कला महोत्सव, बंगाल संगीत महोत्सव, डोवर लेन म्युझिक कॉन्फरन्स ह्या नामवंत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यांनी आपली बहीण रागिणी शंकर ह्यांच्या बरोबर एक व्हीडीयोही तयार केला आहे.

त्या त्यांची बहीण नंदिनी शंकर, आई डॉ.संगीता शंकर आणि आजी एन. राजम ह्यांच्या बरोबर परंपरा नावाचा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम सादर करतात. त्या चौघींनी मिळून मेरु महोत्सव, नेदरलँड्स येथे आणि अशा विविध महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे.[]

शंकर ह्या ‘सखी’ नावाच्या भारतातल्या पहिल्या केवळ महिला सहभागी असलेल्या वाद्य वृंदाचा भाग आहेत. ह्या वाद्यवृंदात गायिका कौशिकी चक्रवर्ती (कलकत्ता) , तबला वादक सावनी तळवलकर (पुणे), बासरी वादक देवप्रिया चटर्जी (मुंबई), कथक नृत्यांगना भक्ती देशपांडे (मुंबई), महीमा उपाध्याय (ओडिशा) या पखवाज वादक अशा देशातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सहा महिला कलाकार सहभागी आहेत.[]     

पुरस्कार

[संपादन]
  • संगीतेंदू पंडीत लालमणी मिश्रा किशोर अध्येत पुरस्कार,२००७
  • जया स्मृती पुरस्कार,२०१२
  • भारताचे उपराष्ट्रपती वेन्कय्या नायुडू यांच्या हस्ते जश्न-ए-यंगीस्तान पुरस्कार ,२०१८[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Sangeeta Shankar". Sangeeta Shankar. 2020-03-28 रोजी पाहिले.
  2. ^ admin. "Nandini Shankar – Musician" (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ Kapoor, Srishti KapoorSrishti; Apr 21, Mirror Online | Updated:; 2018; Ist, 13:47. "Meet Dr Sangeeta Shankar and her daughters Ragini and Nandini Shankar, who weave magic with their violins". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ www.indiannewslink.co.nz http://www.indiannewslink.co.nz/young-violin-master-to-perform-in-new-zealand-next-month/. 2020-03-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ "Kaushiki Chakraborty's Sakhi - Friday, October 16, 2015 | Carnegie Hall". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-06-04. 2020-03-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  6. ^ Correspondent, dna. "Pune's Sawai Gandharva Mahotsav ends on a soulful note". DNA India (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  7. ^ "MERU Concerts". www.facebook.com. 2020-03-28 रोजी पाहिले.
  8. ^ Engl, India New; News. "Kaushiki Chakraborty and SAKHI Band Present Spectacular Show at Full House, Make History". INDIA New England News (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-28 रोजी पाहिले.
  9. ^ "Jashn-E-Youngistan 2018 honoured violinsts Ragini Shankar and Nandini Shankar - News24online". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.