रागिणी शंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रागिणी शंकर
Ragini Shankar.jpg
जन्म १९८९
बनारस, उत्तर प्रदेश
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा व्हायोलिनवादक
मूळ गाव मुंबई
पदवी हुद्दा मेकॅनिकल इंजिनियर
धर्म हिंदू
आई डॉ. संगीता शंकर
नातेवाईक डॉ. एन.राजम, नंदिनी शंकर
संकेतस्थळ
www.raginishankar.com

रागिणी शंकर (१९८९:बनारस, उत्तर प्रदेश - ) या एक भारतीय व्हायोलिन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांच्या कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची नात आहेत.[१]

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

रागिणी शंकर ह्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून आपली आई डॉ. संगीता शंकर ह्यांच्याकडे व्हायोलिन शिकायला सुरुवात केली आणि पहिली सार्वजनिक मैफिल वयाच्या अकराव्या वर्षी सादर केली.[२] त्या गायकी अंगाचे व्हायोलिन वाजवतात. ह्या गायकी अंगाची पद्धत त्यांच्या आजी पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची आहे. त्यांची चित्रकलेची आवड त्यांचे आजोबा टी.एस.सुब्रमण्यन ह्यांच्याकडून आल्याचे दिसते.[३]

शिक्षण[संपादन]

रागिणी शंकर ह्या मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी संगीत विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.[४] त्या त्यांची आजी पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांच्याकडेसुद्धा व्हायोलीन शिक्षणाचे धडे घेत आहेत.

कारकीर्द[संपादन]

रागिणी ह्यांनी २०१६ साली न्यूयॉर्कच्या कार्नेजी हॉल येथे आपली व्हायोकिन कला सादर केली.त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, कॅनडा, नेदरलँड्स, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, बांगलादेश, बेल्जियम, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत. त्यांनी युरोपीया, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, यक्ष(महोत्सव), सप्तक फेस्टिव्हल ऑफ म्युझिक, आरोही फॉर पंचम निषाद, कलकत्त्याच्या इंडियन टोबॅको कंपनीचे आयटीसी एसआरए संगीत संमेलन, नेदरलँड्सचा मेरू महोत्सव, हेमा मालिनी ह्यांनी आयोजित केलेला जया स्मृती कार्यक्रम, टेम्पल ऑफ फाईन आर्ट्‌स, भिलवाडा सुरसंगम, टी. एन. कृष्णन महोत्सव, दिल्ली आंतरराष्ट्रीय कला महोत्सव, बंगाल संगीत महोत्सव, डोव्हर लेन म्युझिक कॉन्फरन्स ह्या नामवंत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.[५] त्यांनी आपली बहीण नंदिनी शंकर ह्यांच्याबरोबर एक व्हीडीओही तयार केला आहे. त्या, त्यांची बहीण नंदिनी शंकर, आई डॉ.संगीता शंकर आणि आजी एन. राजम ह्यांच्याबरोबर परंपरा नावाचा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम सादर करतात. त्यांनी एकत्र हा कार्यक्रम नेदरलँड्स येथे आणि अशा अनेक ठिकाणी सादर केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गीत लेखक इर्शाद कामील ह्यांच्या द इंक बॅंड नावाच्या कविता आणि संगीत एकत्र असलेल्या प्रकल्पाच्या त्या भाग आहेत.[६] प्रसिद्ध फ्रेंच संगीत दिग्दर्शक थेरी पेकू ह्यांच्या एका इंडो-फ्रेंच सांगीतिक प्रकल्प सांगता ह्यामध्ये त्या सहभागी आहेत.[७]

त्यांना भारत सरकारच्या सांकृतिक मंत्रालयाची सांकृतिक शिष्यवृत्ती मिळाली आहे.[७] त्या सध्या मुंबईत राहतात व त्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल ह्या संगीताचे शिक्षण देणाऱ्या शाळेत एक शिक्षिका म्हणून काम करतात.[५].

पुरस्कार[संपादन]

  • संगीतेंदू पंडित लालमणी मिश्रा किशोर अध्येत पुरस्कार,२००७
  • जया स्मृती पुरस्कार,२०१२[५]
  • भारताच्या उपराष्ट्रपतींच्या- वेंकय्या नायडू यांच्या- हस्ते त्यांना जश्न-ए-यंगिस्तान हा किताब मिळाला आहे. (२०१८)[७]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "N. Rajam". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-20.
  2. ^ ":: R A G I N I S H A N K A R - O F F I C I A L W E B S I T E ::". www.raginishankar.com. 2020-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ ":: R A G I N I S H A N K A R - O F F I C I A L W E B S I T E ::". www.raginishankar.com. 2020-03-28 रोजी पाहिले.
  4. ^ Kapoor, Srishti KapoorSrishti; Apr 21, Mirror Online | Updated:; 2018; Ist, 13:47. "Meet Dr Sangeeta Shankar and her daughters Ragini and Nandini Shankar, who weave magic with their violins". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ a b c ":: R A G I N I S H A N K A R - O F F I C I A L W E B S I T E ::". www.raginishankar.com. 2020-03-28 रोजी पाहिले.
  6. ^ IANS (2018-03-21). "Rahman launches Irshad Kamil's INK Band music series". Business Standard India. 2020-03-28 रोजी पाहिले.
  7. ^ a b c ":: R A G I N I S H A N K A R - O F F I C I A L W E B S I T E ::". www.raginishankar.com. 2020-03-28 रोजी पाहिले.