धूमावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धूमावती
Dhumavati.JPG
Affiliation महाविद्या, देवी
Weapon सुप
Consort शिव

धुमावती हे पार्वतीचे एक रूप असून दशमहाविद्या पैकी ही एक देवता आहे. बहुतेक वेळा हिचे रूप हे अशुभ स्वरूपात असते. ही दिसण्यास सावळी, रोड, प्रौढ, विधवा तसेच उदास आणि रया गेलेल्या चेहऱ्याची दर्शवली जाते.

आख्यायिका[संपादन]

एकदा पार्वतीला खूप भूक लागली होती. तेव्हा तिने महादेवाकडे अन्न मागितले. महादेवने थोडा वेळ थांबण्यास सांगितले. पण उपासमाराने खूप अधीर झाल्यावर पार्वतीने महादेवालाच खाऊन टाकले. महादेवाला गिळल्यावर पार्वतीला खूप त्रास झाला. नंतर तिची भूक शांत झाल्यावर महादेव बाहेर पडले. परंतु महादेवाच्या घशातील विषामुळे तिच्या अंगातून धूर निघू लागला. तसेच शरीराचा वर्ण देखील काळवंडला. पार्वतीचे हे विचित्र रूप तसेच सारासार विचारशक्ती गमावल्यामुळे विषण्ण स्वभाव यामुळे ही पुढे रोग, अपयश आणि भांडणाची देवता म्हणून ओळखल्या जाऊ लागली.