धरमपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?धरमपूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .६३१५१ चौ. किमी
जवळचे शहर जव्हार
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,२८९ (२०११)
• २,०४१/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच४८

धरमपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक मार्गाने गेल्यानंतर गोरवाडी बसथांब्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०१ कुटुंबे राहतात. एकूण १२८९ लोकसंख्येपैकी ५८७ पुरुष तर ७०२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४२.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५०.३३ आहे तर स्त्री साक्षरता ३५.८० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २६५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

[[चंद्रनगर, सूर्यनगर, बोराळे, काणाधत्ती, पिंपळगाव, खडखड, भारसातमेट, कुतुरविहीर, अधखडक, हडे, करधण ही जवळपासची गावे आहेत.खडखड ग्रामपंचायतीमध्ये खडखड, धरमपूर ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/