महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान योजना

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.

स्वरूप[संपादन]

वाद झाल्यास तंटामुक्त गाव समितीसमोर वादींनी उभे राहायचे आणि वाद सामोपचाराने सोडवायचे असे याचे प्राथमिक स्वरूप आहे. ही संकल्पना महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारलेलि आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत असलेल्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेवर तंटामुक्ती ग्राम ही संकल्पना उभी आहे. गावाचा विकास गावातच झाला पाहिजे तसेच त्या त्या गावातील प्रश्न देखील त्याच ठिकाणी सोडवता आले पाहिजेत ही बाब यामध्ये अधोरेखित केली गेली आणि एकूणच शासकीय स्तरावर ही योजना सर्वांकश रीत्या राबवली गेल्यामुळे त्याला अद्भुत पूर्ण यश देखील मिळाले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य श्री आर. आर. पाटील यांनी या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला

पुरस्कार[संपादन]

तंटामुक्त गावसाठी एक लाखाचा पुरस्कार दिला जात असे हा पुरस्कार २०१३ नंतर पाच लाख इतका करण्यात आला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या जिल्हास्तरीय समितीत तंटामुक्त योजनेतील पुरस्कारांचा निर्णय होतो.