Jump to content

तलाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तलाठी (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक), ग्राम लेखापाल किंवा करणम (आंध्र प्रदेश), पटवारी (मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल), लेखपाल (उत्तर प्रदेश, उत्तराखंड) हा भारतीय उपखंडातील ग्रामीण भागात कार्यरत असणारा सरकारी कर्मचारी आहे. १६ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुरू करण्यात आलेला हा कर्मचारी आहे. पुढे तो ब्रिटिश राजवटीत देखील कामावर होता. हा अधिकारी राज्याचा प्रतिनिधी म्हणून जमिनीच्या नोंदी, शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी आणि काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये महसूल पोलीस म्हणून काम करण्यासाठी जबाबदार आहे जिथे त्यांना विशेष अधिकार क्षेत्र देण्यात आले होते.

जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

सुरुवात

[संपादन]

दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल (हिन्दीत टोडरमल) नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पद निर्माण केले. भारतातील ब्रिटिश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (हिन्दीत पटवारी) या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातली 'कुळकर्णी वतने' समाप्त केली गेली व पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली.

निवड

[संपादन]

जिल्हा निवड समिति

प्रशिक्षण[]

[संपादन]
अ. क्र. प्रशिक्षणाचे ठिकाण कालावधी
महसूल प्रबोधिनी (पायाभूत प्रशिक्षण) ४ महीने
अनुभवी तलाठी यांचे कार्यालय २ महीने
एकूण प्रशिक्षण कालावधी ६ महीने

नेमणूक करणारे

[संपादन]

जिल्हाधिकारी

शैक्षणिक पात्रता

[संपादन]

पदवी

तलाठ्याची कर्तव्ये

[संपादन]
  • ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे.
  • शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, किंवा सूचना देत असते.
  • नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारीतहसीलदारास देणे.
  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

कार्यक्षेत्र

[संपादन]

तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.

नोंद वह्या

[संपादन]

प्रत्येक गावी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या विशिष्ट नमुन्यांमध्ये तलाठी-दप्तर ठेवलेले असते. या नोंदवहीचे नमुने महसूल कायद्यामध्ये तयार करून देण्यात आले आहेत.

अ.क्र. नमुना नमुन्यातील तपशील
नमुना क्रमांक-१ या नमुन्यात वेगवेगळया धारणा प्रकारच्या खातेदारांकडून किती जमीन महसूल देय आहे, तसेच लागवडयोग्य क्षेत्र किती आहे याची नोंद असते.
नमुना क्रमांक-१चा गोषवारा या नमुन्यात भोगवटादार वर्ग-१ चे क्षेत्र, वर्ग-२ चेक्षेत्र, गावातील नदी, नाले, रस्ता, गायरान व स्मशानभूमी यांचे तपशील असतात.
नमुना क्रमांक-१अ यात वन म्हणून अधिसूचित करण्यात आलेले सर्व क्षेत्र कोणकोणत्या सर्वेक्षण क्रमांकामध्ये आहे त्याचा तपशील असतो.
नमुना क्रमांक-१ब यांत गावातील शासकीय जमिनींची माहिती व त्या जमिनीवरील सार्वजनिक अधिकार एकत्रितरीत्या दाखविले असतात.
नमुना क्रमांक-१क यात ज्या जमीनधारकांना पुनर्वसनासाठी नवीन शर्तीवर जमिनी मिळतात, अशा सर्व जमिनी व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या जमिनींचे तपशील
नमुना क्रमांक-१ड यात जमीन अधिनियिम, १९६१ याच्या उपकलमांनुसार सीलिंग व इतर अतिरिक्त जमिनींची माहिती असते.
नमुना क्रमांक-१इ सरकारी अथवा सार्वजनिक जमिनींवर संबंधित अतिक्रमणाबाबत व आक्रमणावरील कारवाईबाबत माहिती
नमुना क्रमांक-२ सरकारी अथवा सार्वजनिक जमिनींवरील (सजामधील) बिनशेती जमीन धारणा व संबंधित महसुलाबाबत माहिती
नमुना क्रमांक-३ गावातील देवांच्या जमिनी व त्यांच्या करआकारणीमधून शासनाला मिळणारा महसूल
१० नमुना क्रमांक-४ विलंब शुल्कवसुली, गुरे चारण्याचे शुल्क, किंवा सरकारी जमिनीवरील काटेरी झुडपे तोडण्याचे शुल्क यांपासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती
११ नमुना क्रमांक-५ क्षेत्र आणि महसूल याांचा सर्वसाधारण गोषवारा (ठरावबंद- तत्संबंधी खतावणी-जमाबांदी पत्रक)
१२ नमुना क्रमांक-६ फेरफारांची नोंदवही
१३ नमुना क्रमांक-६ अ विवादग्रस्त प्रकरणाांची नोंदवही
१४ नमुना क्रमांक-६ ब विलंब शुल्क प्रकरणाांची नोंदवही
१५ नमुना क्रमांक-६ क वारसा प्रकरणाांची नोंदवही
१६ नमुना क्रमांक-६ ड नवीन उपभार् (पोटहिस्से) नोंदवही
१७ नमुना क्रमांक-७ अधिकार अभिलेख पत्रक
१८ नमुना क्रमांक-७ अ कुळवहिवाट नोंदवही
१९ नमुना क्रमांक-७ ब अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्तींव्यतिरिकत इतर व्यक्तीची नोंद असणारी वही
२० नमुना क्रमांक-८ अ धारणा जमिनीची नोंदवही
२१ नमुना क्रमांक-८ ब येणे रकमा व वसुली यांची वर्गश: खातेवही व सर्व ठरावबंद बाबींच्या चाचणी ताळेबंदांची नोंदवही (असामीवार खतावणी व लावणी पत्रक)
२२ नमुना क्रमांक-८ क मागण्या व वसुली याांची वर्गश: खातेवही आणि जमीन महसुलाखेरीज इतर बाबी (उदा. बाांधबांहदस् ती ववर्यक येणे रकमाांव् यनतररक्त पाटबांधारे ववर्यक येणे रकमा, पोट-हहस् सा भूमापन फी, ववक्रीकर, आयकर इत यादी याांचा चाचणी ताळेबांद याांची नोंदवही (????? निरर्थक!!!)
२३ नमुना क्रमांक-८ ड शासकीय येणे रकमांची व इतर रोख रकमांची नोंदवही
२४ नमुना क्रमांक-९ दैनिक जमापुस्तक (ककदग व जमापुस्तक)(????? निरर्थक!)
२५ नमुना क्रमांक-९ अ जमीन महसुलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसुलीसाठी जमापुस्तक (ककदग व जमापुस्तक)(??? निरर्थक!)
२६ नमुना क्रमांक-९ ब गाव नमुना नऊची पावती पुस्तके व इतर पावती पुस्तके यांच्या संग्रहाची नोंदवही
२७ उदाहरण उदाहरण
२८ उदाहरण उदाहरण

दाखले

[संपादन]

महाराष्ट्रातील तलाठी यांना अधिकार नसल्याने त्यांनी खालील ३६ प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे.

वारस नोंदी प्रमाणपत्र, वारस नोंद पंचनामा, वारसाचा दाखला, वारस अहवाल, वंशावळ पंचनामा, रक्‍तनातेसंबंधाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, अल्पभूधारक असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, एकत्र कुटुम्बाचे प्रमाणपत्र, विभक्‍त कुटुंब असल्याचा दाखला, विधवा-परित्यक्‍ता असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याचा दाखला, अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, नगरपालिकेत हद्द असल्याचा, नसल्याचा दाखला, विद्युत जोडणीना हरकत दाखला, विद्युतपंप असल्याचा वा नसल्याचा दाखला, मालकीच्या शेतात विहीर आहे किंवा नाही याचा दाखला, ५०० फुटाच्या आत विहीर असल्या-नसल्याचा दाखला, शेतातील वृक्षांबाबत, भिक्षुक नसल्याबद्दल, धर्मादाय संस्थांकडून मदत घेत असल्या-नसल्याबाबत, जातीचा दाखला, कायदेशीर सज्ञान- अज्ञान असल्याचा दाखला, चल-अचल संपत्तीचा दाखला, दोन नावांची व्यक्ती एकच असल्याबाबत, जमिनीच्या घराच्या चतुःसीमा. शेतजमीन नकाशा, जमिनीच्या किंमतीचा पंचनामा, बागायत प्रमाणपत्र, मयत व्यक्ती ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दाखला, मयत व्यक्ती कुटुंबप्रमुख असल्याचा दाखला, आदी ३६ प्रकारचे दाखले.

नियमाप्रमाणे आता तलाठी सातबारा उतारा ८ अ उतारा तसेच फेरफार उतारा याच्या प्रमाणित प्रती देतात.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "शासन निर्णय" (PDF).[permanent dead link]