दरडी पंकोळी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दरडी पंकोळी (इंग्लिश:Siberian Collared Martin) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो. खालील भागाचा रंग पांढरा असतो आणि छातीवर पिंगट पट्टा असून वरील भाग पिंगट रंगाचा असतो.

वितरण[संपादन]

हा पक्षी पाकिस्तान, काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, वायव्य बंगाल आणि मध्य प्रदेश या प्रदेशात आढळून येतो.

हे पक्षी फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतात.

निवासस्थाने[संपादन]

दरडी पंकोळी उभ्या दरडी असलेले ओढे,नद्या,आणि सरोवरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली