Jump to content

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ या पानावरून पुनर्निर्देशित)
गणेश मूर्ती

दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[] मंडईच्या गणपतीसह या मंडळाच्या गणपतीला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.

इतिहास

[संपादन]

इ.स. १८९३ साळी दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना केली. त्यांचेच नाव या गणपतीला मिळाले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मूर्ती शंकर अप्पा शिल्पी यांनी घडविली आहे.[] जगभरात या गणपतीचा नावलौकिक असून गणेशोत्सवात आणि विशेष निमित्ताने या गणपतीच्या दर्शनाला भाविक येत असतात.

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य

[संपादन]

या मंडळातर्फे समाजातील वंचित लोकांसाठी विशेष मदत केली जाते. वृद्धाश्रम, अनाथ मुलांचा आश्रम चालविणे, देवदासी महिलांच्या उन्नतीसाठी काम असे या कामाचे स्वरूप आहे.[] सामूहिक स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले जाते. विशेष निमित्ताने या मंदिराला केली जाणारी आरास आणि सजावट हे या मंडळाचे विशेष आकर्षण मानले जाते.

गणेशोत्सवातील आकर्षण

[संपादन]
गणेशोत्सवातील

दगडूशेठ गणपती मंडळाची गणेशोत्सवातील देखावा आणि सजावट भाविकांचे आकर्षण आहे. प्रत्येक वर्षी मंडळातर्फे विशेष लक्षवेधी देखावा तयार केला जातो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यासातही विशेष संकल्पनेवर आधारित रथ तयार केला जातो.[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास". सकाळ. 2021-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ "'अशी' झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची 'स्थापना', मु्र्तीसाठी 'एवढा' खर्च ! जाणून घ्या पूर्ण 'इतिहास'". पोलीसनामा. 2019-08-26. 2021-09-17 रोजी पाहिले.
  3. ^ "गणेशोत्सव - २०१९ : प्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर देखाव्यात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती". लोकमत. 2019-08-30. 2021-09-17 रोजी पाहिले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती