साउथ ऑस्ट्रेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण ऑस्ट्रेलिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गुणक: 30°0′S 135°0′E / 30.000°S 135.000°E / -30.000; 135.000

साउथ ऑस्ट्रेलिया
South Australia
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of South Australia.svg
ध्वज
South Australian Coat of Arms.svg
चिन्ह

साउथ ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलिया देशाच्या नकाशातील स्थान
साउथ ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी ॲडलेड
क्षेत्रफळ १०,४३,५१४ चौ. किमी (४,०२,९०३ चौ. मैल)
लोकसंख्या १६,५०,६००
घनता १.६७ /चौ. किमी (४.३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AU-SA
प्रमाणवेळ यूटीसी+०९:३०
संकेतस्थळ sa.gov.au

साउथ ऑस्ट्रेलिया (इंग्लिश: South Australia) हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला न्यू साउथ वेल्सव्हिक्टोरिया, ईशान्येला क्वीन्सलंड, उत्तरेला नॉर्दर्न टेरिटोरी, पश्चिमेला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही राज्ये तर दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. ऑस्ट्रेलियामधील सर्वात रूक्ष व वाळवंटी भूभाग ह्या राज्यामध्ये स्थित आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या सुमारे १६.५ लाख लोकसंख्येपैकी बव्हंशी वस्ती राज्याच्या आग्नेय भागात मरे नदीच्या काठांवर व समुद्रकिनाऱ्याजवळ वसली आहे. ॲडलेड ही साउथ ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

साउथ ऑस्ट्रेलिया राज्य पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्याने वसवले होते. येथील पहिली वसाहत २८ डिसेंबर १८३६ रोजी निर्माण करण्यात आली. १ जानेवारी १९०१ रोजी व्हिक्टोरिया राणीने दक्षिण ऑस्ट्रेलियाला राज्याचा दर्जा दिला. १३ जानेवारी १९०४ रोजी सद्य ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.

गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: