दंडारणं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दंडारणं हे आंध आदिवासी जमातीचे लोकनाट्य आहे. पैनगंगा नदीच्या खोर्यात वास्तव्यास असलेल्या आंध आदिवासी जमातीत गीत, संगीत नाट्य, पौराणिक कथा विनोदी ढंगाने सादर करत दंडारणं हे रात्रभर सादर केले जाते. पौराणिक दंडकारण्य या प्रदेशात तसेच रामायणमहाभारतातील रंजक कथा दंडारण्यातून सादर केल्या जातात. बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड तसेच यवतमाळ या जिल्ह्यातून वाहणार्या पैनगंगेच्या खोर्तात ही लोकनाट्य कला आजही काही प्रमाणात दिसून येते. सामान्यतः राजा, प्रधान, सोंगाड्या, राणी, दासी, विदूषक व गरजेप्रमाणे सावकार, चौकीदार तसेच पौराणिक पात्रे कथानकातून आपली कला सादर करतात. पुढे चालू...