तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक
Appearance
(त्रिवेंद्रम सेंट्रल रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
तिरुवनंतपुरम सेंट्रल തിരുവനന്തപുരം സെൻട്രൽ भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | तिरुवनंतपुरम, केरळ |
गुणक | 8°29′11″N 76°57′7″E / 8.48639°N 76.95194°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ६.७४ मी |
मार्ग |
तिरुवनंतपुरम-कोल्लम-एर्नाकुलम मार्ग तिरुवनंतपुरम-कन्याकुमारी मार्ग |
फलाट | १२ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९३१ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | TVC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
|
तिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
उत्तरेकडून कोचीमार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून कन्याकुमारीमार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. कोकण रेल्वेमुळे दिल्ली तसेच मुंबई शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.
गाड्या
[संपादन]- तिरुवनंतपुरम सेंट्रल−लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−बंगळूर आयलंड एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−नवी दिल्ली केरळ एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−चेन्नई सेंट्रल जलद एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−चेन्नई इग्मोर अनंतपुरी एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−इंदूर अहिल्यानगरी एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−गुवाहाटी एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम सेंट्रल−कोळिकोड जन शताब्दी एक्सप्रेस
- जम्मू तावी−कन्याकुमारी हिमसागर एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस−कन्याकुमारी जयंती जनता एक्सप्रेस