हिमसागर एक्सप्रेस
हिमसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक आठवड्यातून एक दिवस धावणारी आगगाडी आहे. ही रेल्वेगाडी भारताच्या तामिळनाडू राज्याच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी पासून उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्याच्या वैष्णोदेवी जवळील कटरा शहरापर्यंत धावते. सध्याच्या घडीला हिमसागर एक्सप्रेस प्रवासवेळ व अंतर ह्या दोन्ही बाबतीत भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची गाडी आहे (कन्याकुमारी-दिब्रुगढ विवेक एक्सप्रेस खालोखाल). हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते कटरा दरम्यानचे ३७८७ किमी अंतर ७३ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या प्रवासादरम्यान हिमसागर एक्सप्रेस भारताच्या १२ राज्यांमधून धावते व एकूण ६९ थांबे घेते.[१]
वेळापत्रक
[संपादन]निर्गमन स्थानक | दिवस | वेळ | आगमन स्थानक | दिवस | वेळ | गाडी क्रमांक |
---|---|---|---|---|---|---|
कन्याकुमारी | शुक्रवार | १४:१० | कटरा | सोमवार | १५:२० | 16317 |
कटरा | सोमवार | 21.55 | कन्याकुमारी | गुरुवार | 21.30 | 16318 |
मार्ग
[संपादन]कन्याकुमारी → नागरकोविल → तिरुवनंतपुरम → कोल्लम → एर्नाकुलम → पालक्काड → कोइंबतूर → इरोड → सेलम → जोलारपेट → चित्तूर → तिरुपती → नेल्लोर → तेनाली → विजयवाडा → वारंगळ → चंद्रपूर → नागपूर → इटारसी → भोपाळ → झाशी → ग्वाल्हेर → आग्रा → हजरत निजामुद्दीन → नवी दिल्ली → रोहतक → लुधियाना → जालंधर → पठाणकोट → कथुआ → जम्मू तावी → कटरा
ही गाडी रायपूरच्या जवळ आली की अति वेगाने म्हणजे ताशी १०८ कि.मी. वेगाने धावते तर हजरत निजामुद्दीन ते नवी दिल्ली दरम्यान कमीत कमी वेगाने म्हणजे ताशी २४कि.मी. वेगाने धावते. भोपाळ हबीबगंज ते भोपाल जंक्शन दरम्यान ती ताशी १९ कि.मी. वेगाने धावते. दिल्ली परिसर ओलांडण्यासाठी या ट्रेनला साधारण तीन तास लागतात.[२]