चर्चा:त्रिपुरारी पौर्णिमा
स्कंदजयंती? आणि तीही पौर्णिमेला? कधी ऐकली नाही. स्कंद षष्ठी असते. आश्विन वद्य षष्ठीला स्कंद षष्ठी म्हणतात. .... ज (चर्चा) २१:०१, २० ऑक्टोबर २०१६ (IST)
पानकाढा चर्चा
[संपादन]- विरोध - अभय नातू
या लेखावर लावलेला पानकाढा साचा येथे लागू नाही असे माझे मत आहे.
१. साचा लावणाऱ्या सदस्याच्या म्हणण्यानुसार एकाच दिवसाबद्दल दोन लेख असले तरीही त्रिपुरारी पौर्णिमेबद्दलची विशिष्ट माहिती या लेखात आहे. ही माहिती कार्तिकी पौर्णिमा लेखात घातली असता तो लेख अतिमोठा होईल.
२. या लेखाचा आकार अगदी छोटा नाही. जर एखाद्या सणाबद्दल त्रोटक माहिती असेल तर असी माहिती त्या दिवशीच्या तिथीपानातच असावी. अधिक माहिती असल्यास वेगळा लेख करुन त्यास तिथीपानापासून वेगळा दुवा द्यावा, उदा. २५ डिसेंबर आणि नाताळ, २६ जानेवारी आणि भारतीय प्रजासत्ताक दिन, इ.
चर्चेसााठी इतर मतांचे स्वागतच आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०५:४८, २३ फेब्रुवारी २०१७ (IST)
- अभय नातू यांचे मताशी सहमत. पानकाढा साचा हटवावा व लेख तसाच ठेवावा.--वि. नरसीकर (चर्चा) १०:५०, २३ फेब्रुवारी २०१७ (IST)
त्रिपुरी पौर्णिमा हा लेख अधिक अद्ययावत करते आहे. अभय नातू यांचा प्रतिसाद मलाही योग्य वाटतो. कार्तिक पौर्णिमा या लेखातील भाग मी त्रीपुरीच्या लेखात समाविष्ट करते आहे. आर्या जोशी (चर्चा)
स्कंद जयंती??
[संपादन]मी वर उपस्थित केलेल्या शंकेचे उत्तर अजून मिळालेले नाही.... ज (चर्चा) २२:०८, २ मे २०१७ (IST)
- पानकाढा एवजी त्रिपुरी पौर्णिमा ते → कार्तिक पौर्णिमा विलयन सुचवणारा साचा असावयास हवा होता. त्रिपुरी पौर्णिमा लेखात इनमीन चार परिच्छेद आहेत अजून दोन समजा वाढतील पण त्याने कार्तिक पौर्णिमा लेख अती मोठा होईल हे पटत नाही.
- 'अमुक बद्दलची विशिष्ट माहिती या लेखात आहे' या भूमिका लेख स्वतंत्र असण्यासाठी नक्की पुरेशी आहे का ? आणि असेल तर हाच नियम सर्वत्र सारखेपणाने लावणार का ? कार्तिक पौर्णिमा लेख त्रिपुरी पौर्णिमा मध्ये विलयन केल्याने महिना तिथीच्या नावा पेक्षा सणाचे नाव (अवडंबर) मोठे होते असे वाटत नाही का ?
- 117.223.154.14 १५:४६, २ मे २०१७ (IST)
@ अभय नातू नमस्कार! लेख छोटा आहे पण औचित्य साधून काही बदल केले आहेत.ते पहावेत.आर्या जोशी (चर्चा)
लेख काढू नये या मतांशी सहमत. पण What about स्कंद जयंती? ... ज (चर्चा) १७:३१, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)