तोडा समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोडा समाज
तोडा महिला इ.स. १९००
एकुण लोकसंख्या

2,002 (2011 census)

ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज India

(तमिळनाडू)

भाषा
तोडा भाषा
धर्म
हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम

तोडा समाज हा एक तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगावर उंच पहाडावर राहणारा मागास समाज आहे. तोडा समाजाची बोलीभाषा तोडा भाषा आहे. तोडा भाषा ही कन्नड भाषेशी संबंधित द्रविड भाषासमूहातील एक प्राचीन बोलीभाषा आहे.[१]

तोडा समाज प्रामुख्याने कुंनूर आणि उदगमंडलम (उटी) तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहातो. इ.स. २००१ च्या जनगणने नुसार तोडा समाजाची लोकसंख्या २२०० पर्यंत आहे. हा समाज गोलसर आकाराच्या झोपड्यात रहातो. झोपड्यांच्या समूहास माड असे म्हणतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय हा म्हशीपालनाचा आहे. तोडा समाजात कधीकाळी बहुभार्तृत्व आणि बहुपत्नीत्व या दोन्ही रूढी होत्या. विशेष करून बहुभार्तृत्व म्हणजे एखाद्या महिलेचा जेव्हा एका पुरुषाशी विवाह होतो तेव्हा ती त्याच्या इतर भावांची पण पत्नी होते.[२][३][४][५]

चित्र दालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "TODA" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "तोडा". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "THE TRUTH ABOUT THE TODAS" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "तोडा". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Toda people, India" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.