वर्षा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या १९७३ सालापासून पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकवीत.

त्यांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थाविषयक लेख लिहिले आहेत.

सौदर्य प्रसाधनांवरील पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी जोशी यांनी ज्ञानप्रबोधिनीमध्ये सौंदर्यप्रसाधनांसंबंधीचा एक अभ्यासक्रम केला होता.

वर्षा जोशी यांची प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • अणुऊर्जा : एक पर्याय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सौरभ झा)
  • डॉ. अब्दुल कलाम
  • कथावर्षा (कथासंग्रह, सहलेखिका - देवयानी जोशी)
  • करामत धाग्या-दोऱ्यांची (वस्त्रे या विषयाची यथासांग माहिती)
  • प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
  • १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती (सहलेखिका - डॉ. हेमा क्षीरसागर)
  • वाद्यांमधील विज्ञान (वर्षाबाईंनी या विषयावर सहा चित्रफिती बनवल्या आहेत.)
  • साठीनंतरचा आहार व आरोग्य (दैनिक 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या ३१ लेखांचे संकलन)
  • निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन
  • सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत (साप्ताहिक सकाळमध्ये वर्षा जोशी यांचे या विषयावरचे एकूण ५७ लेख प्रसिद्ध झाले होते त्यांचे हे पुस्तक आहे.)
  • स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम
  • स्वयंपाकघरातील विज्ञान