साडेतीन शक्तिपीठे
महाराष्ट्रात देवीची खालीलप्रमाणे साडेतीन शक्तिपीठे आहेत.
श्री महालक्ष्मी अंबाबाई, करवीर
[संपादन]आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आद्यपीठ आहे. हे महामातृक स्थान आहे. इथे मुळ आदिमाया आदिशक्ती भगवती महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती विराजमान आहेत. करवीर नगरी ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवी महालक्ष्मी अंबाबाई ने कोल्हासुराचा वध केला.
ॐ श्री अंबाबाई देव्यै नमः
श्री तुळजाभवानी अंबाबाई, तुळजापूर
[संपादन]महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आई तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. ही आदिशक्ती पार्वती मातेचे स्वरूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. जगदंबेने कुक्कुरासुराचा वध केला होता.
ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमः
श्री रेणुका अंबाबाई माता, माहुरगड
[संपादन]रेणुका देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. या देवीला 'एकवीरा', 'यमाई', 'येल्लुआई' तसेच 'येल्लम्मा' अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते. ही देवी आदिशक्ती पार्वती देवीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात.
ॐ श्री रेणुका देव्यै नमः
श्री सप्तशृंगी अंबाबाई देवी, वणी
[संपादन]नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. महिषासुरमर्दिनी म्हणून ही देवी प्रसिद्ध आहे. महिषासुराचा वध करणारी देवी अठरा हातांची महालक्ष्मी हीच आहे. देवी महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती अशी त्रिगुणात्मक स्वरूप आहे.
ॐ श्री महिषासुरमर्दिनी देव्यै नमः