तिथवली (वैभववाडी)
तिथवली
तिथवली | |
|---|---|
|
गाव | |
| गुणक: 16°33′56″N 73°38′41″E / 16.5656°N 73.6446°E | |
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| जिल्हा | सिंधुदुर्ग |
| तालुका | वैभववाडी |
| सरकार | |
| • Body | ग्रामपंचायत |
| क्षेत्रफळ | |
| • एकूण | ८.८४ km२ (३.४१ sq mi) |
| लोकसंख्या (2011) | |
| • एकूण | ९९५ |
| • लोकसंख्येची घनता | ११०/km२ (२९०/sq mi) |
| भाषा | |
| • अधिकृत | मराठी |
| प्रमाणवेळ | UTC+5:30 (IST) |
| पिन |
416703 |
| दूरध्वनी | 02321 |
| वाहन नोंदणी | MH- |
तिथवली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यात वसलेले गाव आहे. ते गाव व ग्रामपंचायत, दोन्ही रूपात अस्तित्वात आहे. 14
भौगोलिक स्थान
[संपादन]तिथवली हे कोकण भागातील, तटवर्ती न जोडलेले पण डोंगराळ भागात वसलेले गाव आहे. गावाचे अंदाजे अक्षांश — 16.5656°N आणि रेखांश — 73.6446°E आहे. 15 परिसरात पिकांची शेती, निसर्गरम्य परिसर, हिरवी झाडी, लहान दऱ्या/ओढ्या व पाऊसाळी हवामान दिसते.
इतिहास आणि लोकजीवन
[संपादन]तिथवली गाव आहे अति प्राचीन असून डोंगर रांगांमध्ये वसलेले आहे.गावात वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक एकोप्याने राहतात. या गावातून खारेपाटण उंबर्डे हा रस्ता जातो या रस्त्यामुळे गावाचा विकास होण्यासाठी मदत झाली आहे.
तिथवली तलाव-या गावातील प्रसिद्ध व निसर्गरम्य असे हे तलाव आहे .या तलावाच्या पाण्यावर उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते दुग्ध व्यवसाय केला जातो.
जामदा पूल गावातून जाणाऱ्या सुख नदीवर जामदा पूल बांधलेला आहे यामुळे हा गाव मुंबई गोवा हायवे ला जोडलेला आहे.
प्रशासन तिथवली गावात एकूण बारा वाड्या आहेत. या गावात दिगशीगाव समाविष्ट आहे. ग्रामपंचायतचा कारभार व्यवस्थित चालू आहे.
शिक्षण आणि संस्कार तिथली हे केवळ निसर्गसुंदरांनीच नव्हे तर सर्व प्रकारच्या सुख सोयीने संपन्न असे गाव आहे या गावात तीन शाळा आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा कार्य शिक्षक आनंदाने करत आहेत. विद्यार्थी शिक्षणाबरोबर कला नृत्य गायन इत्यादी क्षेत्रातही अभ्यास करत आहेत. कम्प्युटरचे शिक्षण दिले जाते.२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 995 आहे, ज्यात 464 पुरुष व 531 महिला आहेत. एकूण 250 घरं गावात आहेत. गेल्या दशकात स्थानिक पिढीजात शेतीवर आधारित जीवनशैली राहिली आहे. 16
शिक्षण
[संपादन]तिथवली गावात प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय असून पुढील शैक्षणिक संस्था येथे कार्यरत आहेत :

* श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तिथवली क्र. १ – गावातील प्रमुख प्राथमिक शाळा.

* शाळा तिथवली तावडेवाडी – तावडेवाडी परिसरातील प्राथमिक शिक्षण देणारी शाळा.
- स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदिर – माध्यमिक शिक्षणाची सुविधा देणारी संस्था.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गांगेश्वराचे मंदिर
[संपादन]
तिथवली गावातील गांगेश्वराचे मंदिर हे गावातील धार्मिक संस्कृतीचे केंद्रस्थान आहे. दर वर्षी दसऱ्याच्या नऊ दिवसांत येथे गरबा नृत्य सादर केले जाते. या सांस्कृतिक परंपरेमुळे हे मंदिर गावाच्या ओळखीचा महत्त्वाचा घटक आहे.
ग्राम पर्यटन
[संपादन]
तिथवली गावात गवती चहा पासून सुगंधी केलं व साबण तयार करणारी सुगंधी इसेन्स ही लघुउद्योग संस्था आहे. या उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनांचा उपयोग स्थानिक लोकांना होतो तसेच रोजगाराची संधीही उपलब्ध होते.
वन्यजीव आणि जैवविविधता
[संपादन]काही दिवसांपूर्वी तिथवली परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला होता. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिल्यामुळे गावाचे रक्षण करण्यात मदत झाली. निसर्गसंपन्न परिसर, जैवविविधता आणि रम्य वातावरणामुळे तिथवली हे सिंधुदुर्गातील एक सुंदर व निसर्गरम्य गाव म्हणून ओळखले जाते.
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/