Jump to content

तारकेश्वरी सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tarkeshwari Sinha (es); তারকেশ্বরী সিংহ (bn); Tarkeshwari Sinha (hu); Tarkeshwari Sinha (ast); Tarkeshwari Sinha (ca); Tarkeshwari Sinha (yo); Tarkeshwari Sinha (de); ତାରକେଶ୍ୱରୀ ସିନ୍‌ହା (or); Tarkeshwari Sinha (ga); Tarkeshwari Sinha (da); Tarkeshwari Sinha (sl); तारकेश्वरी सिन्हा (mr); Tarkeshwari Sinha (sv); Tarkeshwari Sinha (nn); Tarkeshwari Sinha (nb); Tarkeshwari Sinha (nl); Tarkeshwari Sinha (fr); തർക്കേശ്വരി സിൻഹ (ml); ᱛᱟᱨᱠᱮᱥᱣᱚᱨᱤ ᱥᱤᱱᱦᱟ (sat); ਤਾਰਕੇਸ਼ਵਰੀ ਸਿਨਹਾ (pa); Tarkeshwari Sinha (en); తార్కెశ్వరి సిన్హా (te); ತರ್ಕೇಶ್ವರಿ ಸಿನ್ಹಾ (kn); தர்கேஸ்வரி சின்ஹா (ta) política india (es); política india (1926–2007) (ast); política índia (ca); polaiteoir Indiach (ga); سیاست‌مدار هندی (fa); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); indisk politiker (sv); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱨᱟᱡᱽᱟᱹᱨᱤᱭᱟᱱ (sat); Indian politician (en-ca); 2ஆவது மக்களவை உறுப்பினர் (ta); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); femme politique indienne (fr); India poliitik (et); भारतीय राजकीय क्षेत्रातील महिला (mr); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); política india (gl); ഇന്ത്യന്‍ സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തില്‍ പങ്കെടുത്ത വനിത (ml); indisk politiker (da); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (1926-2007) (nl); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); індійський політик (uk); ಭಾರತೀಯ ರಾಜಕಾರಣಿ (kn); politikane indiane (sq); Indian politician (1926-2007) (en); سياسية هندية (ar); Indian politician (en-gb); భారతీయ రాజకీయవేత్త (te)
तारकेश्वरी सिन्हा 
भारतीय राजकीय क्षेत्रातील महिला
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर २६, इ.स. १९२६
पाटणा
मृत्यू तारीखऑगस्ट १४, इ.स. २००७
नवी दिल्ली
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तारकेश्वरी सिन्हा (२६ डिसेंबर १९२६ - १४ ऑगस्ट २००७) या बिहारमधील भारतीय राजकारणी आणि स्वातंत्रता कार्यकर्त्या होत्या. देशातील पहिल्या महिला राजकारण्यांपैकी त्या होत्या व त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली. १९५२ मध्ये वयाच्या २६व्या वर्षी त्या पाटणा पूर्व मतदारसंघातून पहिल्या लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये बढ लोकसभा मतदारसंघातून त्या पुन्हा लोकसभेवर निवडून आल्या. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालील १९५८ ते १९६४ त्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या महिला उप-अर्थमंत्री होत्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि तोक्यो येथे शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.[] [] []

गुलजार यांचा समीक्षकांनी गाजलेला चित्रपट, आंधी हा इंदिरा गांधींव्यतिरिक्त काही अंशी तारकेश्वरी सिन्हा यांच्याकडून प्रेरित होता.[]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

त्यांचा जन्म नालंदा जिल्ह्यातील चंडीजवळील तुळशीगड गावात भूमिहार कुटुंबात झाला. त्या पाटण्यातील बांकीपूर गर्ल्स कॉलेजची विद्यार्थिनी होती, ज्याला आता मगध महिला कॉलेज म्हणून ओळखले जाते. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनपासून फारकत घेतलेल्या बिहार विद्यार्थी काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात मास्टरस् पदवी मिळवली.

त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. []

कारकीर्द

[संपादन]

भारतीय स्वातंत्र्यानंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी बिहारमधील बाढ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पाटणा पूर्व मतदारसंघातून त्या पुन्हा १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये निवडून आल्या.[]

सिन्हा १९ नोव्हेंबर १९५७ रोजी अमेरीकन गेम शो <i>टू टेल द ट्रुथ</i> मध्ये दिसल्या आणि पॅनेलमधील चार सदस्यांपैकी दोन सदस्यांना मूर्ख बनवले.[]

त्या मोरारजी देसाईंच्या जवळच्या मानल्या जात होत्या. लाल बहादूर शास्त्री नंतर पंतप्रधान होण्यासाठी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यातील उत्तराधिकाराच्या लढाईत त्या देसाईंच्या बाजूने होत्या. जेव्हा देसाई आणि इतर नेत्यांनी काँग्रेसमधून फुटीर गट तयार करण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्याही त्यात सामील झाल्या. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरांच्या लाटेत, त्यांना धरमवीर सिन्हा यांच्याकडून बाढमधून पराभव पत्करावा लागला. पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही त्या हरल्या आणि इंदिरा गांधींच्या पक्षात परतल्या. १९७७ मध्ये, तिने बेगुसरायमधून काँग्रेस उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि बिहारमध्ये काँग्रेसचा पूर्ण पराभव झाल्याने जनता लाटेत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर, तिने नोव्हेंबर १९७८ मध्ये समस्तीपूरमधून काँग्रेस उमेदवार म्हणून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली पण पुन्हा पराभव झाला. 

कालांतराने तिने राजकारणातून निवृत्ती घेतली आणि सामाजिक कार्य हाती घेतले.

समाजकार्य

[संपादन]

तारकेश्वरी सिन्हा यांनी, नवी दिल्ली येथे तुलसीगड येथे एक रुग्णालय उभारले होते त्यांचे भाऊ कॅप्टन गिरीश नंदन सिंग यांच्या स्मरणार्थ जे एर इंडियाचे पायलट होते व विमान अपघातात मृत्युमुखी पडले. दुमजली हॉस्पिटल बांधण्यासाठी तिने जवळपास २५ लाख रुपये जमा केले होते, ही त्या काळात मोठी रक्कम होती व रुग्णालयात उपचार जवळपास मोफत होते. नालंदामधील चंडी आणि हरनौत या गावाला जोडण्यासाठी रस्ता बांधण्यासाठीही तिने पुढाकार घेतला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Qureshi, Muniruddin (2004). Social Status of Indian Women: emancipation. Anmol Publications Pvt. Ltd. p. 920. ISBN 978-81-261-1360-6.
  2. ^ R. Vatsyayan (2008-04-04). "Beauty and Brains". The Hindustan Times. 30 September 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-04-04 रोजी पाहिले.
  3. ^ V. Gangadhar (2008-04-04). "Where is reality?". द हिंदू. रोजी मूळ पानापासून संग्रहित17 December 2001. 2008-04-04 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  4. ^ Sanjay Suri. "Mrs. G's String of Beaus".
  5. ^ a b "Tarkeshwari Sinha". veethi.com. 2017-08-19 रोजी पाहिले.
  6. ^ YouTube
  7. ^ A.J.Philip (2008-04-04). "A Beautiful Politician". The Tribune. 2008-04-04 रोजी पाहिले.