तांबळडेग
?तांबळडेग महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवगड |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
तांबळडेग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]देवगड तालुक्यातील निसर्ग संपन्न गावांपैकी एक गाव म्हणजे तांबळडेग होय. देवगड पासून सुमारे 30 कि.मी. तर कुणकेश्वर पासून 15 कि.मी. आणि मिठबांव येथुन 5 कि.मी. अंतरावर तांबळडेग गाव आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन रुपेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मीती केली असावी. समुद्र किनाय्राला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता गजबा देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. भौगोलिक महत्त्व पाहता ग्रँनाईट या खनिजाच्या साठ्यांनी संपन्न असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अतीशय अनुकूल आहे. गावचा प्रमुख व्यवसाय मासेमारी असून, तांबळडेगची खास ओळख म्हणजे. अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे प्रजननासाठी या किनाय्राला पसंती दर्शवितात. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करून शेकडो कासवे येथून समुद्रात सोडली जातात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना फारशी याची माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा याठिकाणी आवर्जुन येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चीत भेट द्यावी.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. गावातील पूर्ण भाग वालुकामय असल्याने पावसाळ्यात येथे कोणतीही शेती केली जात नाही नारळ हे या गावातील प्रमुख फळपीक आहे. काही प्रमाणात काजूची लागवड आहे
लोकजीवन
[संपादन]येथील लोकजीवन अतिशय साधे असून मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]दक्षिण कोकणच प्रति पंढरपूर श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर (मधलीवाडी),तांबळडेग
हे मंदिर पर्यटन स्थळ आणि जागृत देवस्थान आहे,
श्री. महापुरुष मंदिर दक्षिणवाडा,
- श्री देवी गजबा देवी मंदिर,मिठबांव
- श्री साई मंदिर (उत्तरवाडा), तांबळडेग
- २.५ किलोमीटर तांबळडेग समुद्र किनारा
- कांदळवन सफारी
- प्रशस्त वाचनालय इमारत
- समुद्र-खाडी संगम पॉईंट
- सूर्यास्त पॉईंट
- डॉल्फिन मासे
- रापण मासेमारी
- खेकडा कोळंबी प्रकल्प
बस सेवा, हॉटेल व्यवसाय, शाळा, वाचनालय, ग्रामपंचायत, पोस्ट कार्यालय,
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]◉ मिठबांव
◉ मोर्वे
◉ कातवण
◉ कुणकेश्वर
◉ हिंदळे
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/